घरदेश-विदेशअटलांटिक महासागरात बोट बुडाली; ५८ जणांचा मृत्यू

अटलांटिक महासागरात बोट बुडाली; ५८ जणांचा मृत्यू

Subscribe

अटलांटिक महासागरात प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बोटीत पश्चिम आफ्रिकेतील गाम्बिया देशाचे नागरिक होते. हे सर्व नागरिक शर्णार्थी असल्याचे बोलले जात आहे. ते बोटीतून युरोपला जात होते. बोटीतील सर्वजन युरोपला जात होते. मात्र डकार येथे अरबी समुद्रात हा अपघात घडला. या दुर्घटनेत आतापर्यंत ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.

बोटीचे संपले होते इंधन

सेनेगलचा शेजारील देश गाम्बिया या देशातून २७ नोव्हेंबरला युरोपच्या दिशेला जाण्यासाठी बोट निघाली होची. या बोटीत सुमारे १५० लोक होती. त्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा जास्त समावेश होता, अशी माहिती मिळत आहे. ही बोट पश्चिम आफ्रिकेतील मॉरिटानिया या देशाच्या जवळ आल्यावर बोटीतील इंधन संपले होते. त्यानंतर ही दुर्घटना घडली. बोट उलटल्यानंतर ८३ जणांनी पोहून जीव वाचवला. तर आतापर्यंत ५८ जणांचे मृतदेह मिळाले आहेत. हा अपघात सर्वात मोठा अपघात आहे, असे शरणार्थींसाठी काम करणाऱ्या एजन्सीने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -