घरदेश-विदेशबँक ऑफ बडोदा,देना बँक आणि विजया बँक १ एप्रिलपासून होणार विलीन

बँक ऑफ बडोदा,देना बँक आणि विजया बँक १ एप्रिलपासून होणार विलीन

Subscribe

बँक ऑफ बडोदा,देणा बँक आणि विजया बँक या तीन बँकांचे विलीनीकरण १ एप्रिल पासून होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या विलीनीकरणाचा प्रस्ताव मंजूर केला होता. या बँकांच्या विलिनी करणानंतर खाते दारांना 'या' नवीन सुविधा मिळणार आहे.

बँक ऑफ बडोदा (बीओबी), देना बँक आणि विजया बँक या तीन बँँकेचे विलीनीकरण १ एप्रिल पासून होणार आहेत. या विलीनीकरणामध्ये देना बँक आणि विजया बँक या बँकेतील खाते धारकांचे खाते हे बँक ऑफ बडोदामध्ये टाकण्यात येणार आहे. विजया बँक आणि देना बँकेच्या शेअर धारकांनाही याचा फायदा होणार आहे. विलीनीकरणाच्या योजनेअंतर्गत विजया बँकेच्या शेअर धरकांना १ हजार शेअर्समागे ४०२ इक्विटी शेअर्स मिळणार आहे आणि देना बँकेच्या शेअर धारकांना १ हजार शेअर्समागे ११० इक्विटी शेअर्स मिळणार आहे.

देशातील तिसरी मोठी बँक

विलीनीकरणानंतर बँक ऑफ बडोदा ही देशातील तिसरी सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाणार आहे. सद्यस्थितीत  स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ४५.८५ लाख कोटी रुपये, एचडीएफसी १५.८ लाख कोटी आणि आयसीआयसीआय बँक ११.०२ लाख कोटी या बँका पहिल्या तीन क्रमांकवर आहेत. विलीनीकरणानंतर बँक ऑफ बडोदा (बीओबी) ची किंमत १५.४ लाख कोटी होणार आहे. यामुळे ही बँक तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे.

- Advertisement -

ग्राहकांवर होणारे परिणाम

ग्राहकांना नवीन खाते क्रमांक आणि नवीन ओळखपत्र मिळू शकतात

ज्या ग्राहकांना नवीन खाते क्रमांक दिले जातील त्यांचे IFSC कोड बदलले जाणार आहेत

- Advertisement -

SIP किंवा EMI सुरु असलेल्या खाते दारांना पुन्हा फॉर्म भरवा लागू शकतो

नवीन चेकबुक आणि डेबिट/क्रेडिट कार्ड ग्राहकांना मिळणार आहेत

फिक्स डिपॉझीट (एफडी) किंवा रिकरिंग डिपॉझीट (आरडी) याच्यावर मिळालेल्या व्याज दरात बदल होणार नाहीत

कारलोन, होमलोन, पर्सनललोन किंवा इतर कारणासाठी घेतलेले लोन याच्या व्याजदरात काही बदल होणार नाहीत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -