घरदेश-विदेशबालाकोटमध्ये २०० दहशतवाद्यांचा खात्मा? Video व्हायरल

बालाकोटमध्ये २०० दहशतवाद्यांचा खात्मा? Video व्हायरल

Subscribe

पाकिस्तानने हल्ला झाल्यानंतर दहशतवादी मारले गेल्याचा दावा फेटाळला असला तरी, पाकने बालाकोट येथे जाण्यापासून प्रसार माध्यमांना रोखले आहे.

भारताने बालाकोटमध्ये केलेल्या ‘एअर स्ट्राईक’मध्ये नक्की किती दहशतवादी मारले गेले? या मुद्द्यावरुन मध्यंतरी खूपच राजकारण केले गेले. दुसरीकडे भारताने केलेल्या या हल्ल्यात केवळ काही झाडं पडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र, आता बालाकोटमधून २०० दहशतवाद्यांचे मृतदेह खैबर पख्तुनख्वामध्ये नेण्यात आल्याची माहिती, अमेरिकेत असलेल्या गिलगीटमधील एका कार्यकर्त्याने ट्वीटरद्वारे दिली आहे. मृत दहशतवाद्यांच्या आकडेवारीची पुष्टी करणारा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत भारताने एअरस्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी २०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना पुरल्याचे कबुल केले आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये पाक सैन्याचे काही अधिकारी स्थानिक लोकांशी बोलत आहेत. मात्र, या व्हिडिओच्या सत्यतेबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पाकिस्तानने हल्ला झाल्यानंतर दहशतवादी मारले गेल्याचा दावा फेटाळला असला तरी, पाकने बालाकोट येथे जाण्यापासून प्रसार माध्यमांना रोखले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या हवाई हल्ल्यात आमचे काहीच नुसकान झाले नसल्याचा दावा केला होता. मात्र, पाकिस्तानी लष्कराने प्रसार माध्यमांना रोखल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -