‘जुग जुग जियो’मध्ये वरुण आणि कियाराची दमदार केमिस्ट्री

bollywood actor varun dhawan and kiaras sizzling chemistry to be seen in jug jug jio the films first look release
'जुग जुग जियो'मध्ये दिसणार वरुण आणि कियाराची दमदार केमिस्ट्री

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी या दोघांची सिजलिंग केमिस्ट्री लवकरच पाहायला मिळणार आहे. वरुण आणि कियार सिल्वर स्क्रिनवर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपट ‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर धर्मा प्रोडक्शनने ऑन-स्क्रीन कपलचा पहिला लूक शेअर केला आहे. वरुण आणि कियाराने देखील हा पहिला लूक आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

वरुण आणि कियाराचा ‘जुग जुग जियो’ मधला लूक चाहत्यांना खूपच आवडत आहे. वरुणने लूक शेअर करत लिहिले आहे की, ‘#जुग जुग जियो हॅपी वाईफ, हॅपी लाईफ’. तर कियारने लिहिले की, ‘#जुग जुग जियो हॅपी हसबँड, हॅपी लाईफ’.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

‘जुग जुग जियो’ या चित्रपटात वरुण आणि कियारा व्यतिरिक्त अनिल कपूर आणि नीतू कपूर या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. अनिल कपूर आणि नीतू कपूरच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. याबाबत निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने १७ नोव्हेंबरला सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली आहे. अभिनेत्री नीतू कपूर यांनी शूटिंग दरम्यान काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

अभिनेत्री नीतू कपूर यांनी शूटिंग दरम्यान काही फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नीतू कपूर खूप वर्षानंतर पुन्हा एकदा कॅमेरा समोर आल्या आहेत. नीतू कपूर यांनी सेटवरील फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘खूप वर्षानंतर सेटवर परतली आहे. एक नवी सुरुवात आणि चित्रपटांची जादू आहे. आई, कपूर साहेब आणि रणबीर सतत माझ्यासोबत आहे. थोडी घाबरली आहे, परंतु मला माहिती आहे की, तुम्ही माझ्यासोबत नेहमी आहात.’


हेही वाचा – एअरपोर्टवर मिल्खा सिंह यांना पाहताच उर्वशी रौतेलाने धरले पाय