Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश प्रसिद्ध फॅशन डिझायनर सत्य पॉल यांचे निधन, कंगनाने वाहिली श्रद्धांजली

प्रसिद्ध फॅशन डिझायनर सत्य पॉल यांचे निधन, कंगनाने वाहिली श्रद्धांजली

फॅशन जगतातले सत्य पॉल हे खूप मोठे नाव होते. अनेक गारमेंट्स कंपनीमध्ये त्यांनी कपडे डिझाइन केले होते.

Related Story

- Advertisement -

प्रसिद्ध फॅशन डिझायनर सत्य पॉल यांचे दिर्घ आजाराने निधन झाले. तमिळनाडूच्या कोयंबतूर येथे बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून सत्य पॉल हे आजारी होते. डिसेंबर महिन्यात त्यांन ब्रेन स्ट्रोकही झाला होता. त्यावर त्यांचे उपचारही चालू होते. फॅशन जगतातले सत्य पॉल हे खूप मोठे नाव होते. अनेक गारमेंट्स कंपनीमध्ये त्यांनी कपडे डिझाइन केले होते. त्याचा मुलगी पुनीत यांनी पॉल यांच्या निधनाची बातमी दिली.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने त्यांना श्रद्धांजली दिली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, असे कंगनाने म्हटले आहे. सत्य पॉल यांच्या मुलाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर कंगनाने सत्या पॉल यांना श्रद्धाजली वाहिली आहे. पुनित नंदाने वडिलांचा फोटो पोस्ट करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘सगळ्यांचे धन्यवाद ज्यांनी ज्यांनी मेसेज केले आहेत. २ डिसेंबरला पॉल यांना स्ट्रोक आली. ते हळू हळू हॉस्पिटलमध्ये ठिक होत होते. त्यांची एकच इच्छा होती की त्यांच्या देखरेखीखाली जे काही घडले ते मिळावे. डॉक्टरांनी त्यांना घर पाठवले होते. आम्ही त्यांना पुन्हा ईशा योगा सेंटरमध्ये घेऊन आलो. ते या ठिकाणी गेल्या १५ वर्षांपासून येत होते. गुरूंच्या आशिर्वादाने स्वत: च्या शांततेत त्यांचे निधन झाले. ते फॅशन डिझायनर होते हे बहुतेक लोकांना माहिती नव्हते’, असे त्यांनी लिहिले आहे.

- Advertisement -

त्यांची सुरूवात ही ७०च्या दशकातील आहे. कृष्णमूर्ती नंतर ते ओशोमधून निवृत्त झाले. १९९०मध्ये ओशो गेल्यानंतर त्यांनी दुसऱ्या मालकाचा शोध घेतला नाही. २००७मध्ये त्यांना सद्गगुरूचा शोध लागला. त्यानी त्यानंतर लगेचच योगाचा आनंद घेण्यास सुरूवात केली. अध्यात्मकच्या बोजूने ते हजारो लोकांचे प्रवेशद्वार बनले. ते आपल्या गुरूंसोबत राहत होते. त्यांनी आयुष्यात आलेल्या लोकांना कोणत्याही क्षणी संकोच किंवा अडथळ्याशिवाय प्रेम दिले, हा त्यांचा सर्वात मोठा करार आहे, असेही पुनीतने म्हटले आहे. ईशा योग केद्रांनेगी सत्य पॉल यांच्या निधनाची बातमी त्यांच्या ट्विटरवरून दिली आहे.


हेही वाचा – सूरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर नवा ग्रीन हायवे, सॅटेलाईट सिस्टमद्वारे टोल वसुली

- Advertisement -