घरदेश-विदेशPulwama Terror Attack : बॉलीवूडकरांनी नोंदवला निषेध

Pulwama Terror Attack : बॉलीवूडकरांनी नोंदवला निषेध

Subscribe

'ही घटना कधीही न विसरण्यासारखी आहे. वीर जवानांच्या आत्म्याला शांती लाभो. जखमी जवान लवकर बरे व्हावे ही प्रार्थना', अशी भावना अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केली आहे.

भारतीय लष्कराच्या ताफ्यावर पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. काश्मीर खोऱ्यात झालेल्या या हल्ल्यामध्ये जवळपास ४४ भारतीय जवानांना हकनाक त्यांचे प्राण गमवावे लागले. या हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वसामान्य लोक आक्रोश व्यक्त करताना दिसत आहेत. कुठे ‘पाकिस्तान का नामो निशान मिटा दो’ असे नारे लावून तर कुठे पाकिस्तानचा झेंडा जाळून जनता आपला राग व्यक्त करत आहे. देशातील अनेक बड्या राजकीय नेत्यांनीही या हल्ल्याबाबत हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बॉलीवूड कलाकारांनीही पुलवामा हल्ल्याविषयी हळहळ व्यक्त केली आहे. ‘या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली’, अशा अर्थाच्या प्रतिक्रिया अनेक कलाकारांनी ट्वीटरद्वारे व्यक्त केल्या आहेत.

‘ही घटना कधीही न विसरण्यासारखी आहे. वीर जवानांच्या आत्म्याला शांती लाभो. जखमी जवान लवकर बरे व्हावे ही प्रार्थना’, अशी भावना अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केली आहे. याव्यतिरिक्त प्रियांका चोप्रा, विकी कौशल, आलिया भट्ट, रणवीर सिंग, अभिषेक बच्चन, अनुपम खेर आदी बॉलीवूडकरांनी आपल्या प्रतिक्रिया ट्विटरद्वारे व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -