घरदेश-विदेशअॅटवूड, एव्हारिस्टो यांनी बुकर पुरस्कार

अॅटवूड, एव्हारिस्टो यांनी बुकर पुरस्कार

Subscribe

विशेष म्हणजे 'बुकर' जिंकणाऱ्या एव्हारिस्टो या पहिल्या कृष्णवर्णीय लेखिका ठरल्या आहेत.

२०१९ चे ‘बुकर’ पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. यंदा हे पारितोषिक दोघांमध्ये विभागून देण्यात आले आहे. कॅनेडियन लेखिका मार्गारेट अॅटवूड आणि ब्रिटिश लेखिका बर्नार्डिन एव्हारिस्टो या दोघींना २०१९ चे ‘बुकर’ पारितोषिक जाहीर झाले आहे. विशेष म्हणजे ‘बुकर’ जिंकणाऱ्या एव्हारिस्टो या पहिल्या कृष्णवर्णीय लेखिका ठरल्या आहेत.

यंदा ‘बुकर’ साठी अंतिम ठरलेल्या ६ पुस्तकांच्या यादीत ब्रिटीश-भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्या ‘किशॉट’ या पुस्तकाचासुद्धा समावेश होता. ‘बुकर’च्या निवड समितीच्या नियमानुसार हा पुरस्कार विभागून दिला जात नाही. अॅटवूड यांच्या ‘द टेस्टामेंट’ आणि एव्हारिस्टो यांच्या ‘गर्ल वुमन अदर’ या दोन्ही पुस्तकांपैकी कोणत्याही एका पुस्तकाची निवड करणे शक्य नसल्याने निवड समितीने यंदा हे पारितोषिक विभागून दिले आहे.

- Advertisement -

‘हा पुरस्कार मिळाल्याने मी खूप आनंदित झाले आहे. आम्हा दोघींनाही पुरस्कार मिळतो आहे त्याचा मला विशेष आनंद आहे.
मार्गारेट अॅटवूड, कॅनेडियन लेखिका

ब्रिटनमध्ये वास्तव्य करणाऱ्या कृष्णवर्णीय लोकांचे भावविश्व मी कागदावर उतरवले नाही तर कोणीही हे काम करणार नाही. त्यामुळे मी हे काम केले. हा पुरस्कार अॅटवूड यांच्यासह मिळाल्यामुळे मी आनंदित झाली आहे.’
बर्नार्डिन एव्हारिस्टो, ब्रिटिश लेखिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -