या चिमुरड्याच होतय कौतुक; त्यामागच कारणही तसच

सध्या या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Mumbai
कोंबडीचे पिल्लू हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेल्या मुलाचा फोटो व्हायरल

आपल्या सायकलखाली येऊन कोंबडीचे पिल्लू चुकून जखमी झाले. त्यामुळे या चिमुकल्याने त्या कोेंबडीच्या पिल्लाच्या उपचारासाठी थेट हॉस्पीटल गाठले. त्या लहान मुलाच्या निरागसतेच दर्शन घडवणारा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला अनेक अपघाताच्या किंवा हाणामारीच्या घटना घडत असतात. अशा वेळी आपण काढता पाय घेतो, किंवा अशा घटनांच्या चित्रीकरणाचा मोह अनेकांना अवरत नाही. मात्र मिझोराम राज्यातील साइरंग येथील या मुलाच्या निष्पाप आणि मानवतेच दर्शन घडवणारा फोटो सध्या चांगलाच व्हायर होत आहे.

As per Reports: This young boy from Sairang, Mizoram, accidentally ran over his neighbour's chicken. He took the…

Sanga Says ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 2, 2019

हा चिमुरडा सायकल चालवत होता. सायकल चालवत असताना चुकून त्याची सायकल कोंबडीच्या पिल्लावरुन गेली. यामुळे ते कोंबडीचे पिल्लू जखमी झाले. त्यामुळे या मुलाला अपराधी वाटू लागले. त्याने पॉकिटमनीमध्ये असलेले पैस घेतले आणि थेट रुग्णालय गाठले. त्याच्या एका हातात पैस होते, तर त्याच्या दुसऱ्या हातात ते कोंबडीचे जखमी पिल्लू होते. यावेळी त्या मुलाच्या चेहऱ्यावरील निरागस भाव असलेले फोटो एका फेसबुक युजरने आपल्या आकाऊंट शेअर केले. त्यानंतर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.

या फोटोला फेसबुकवर काही अवधीतच लोखो लाइक्स मिळाले आहेत. तर पंच्चात्तर हजारापेक्षा अधिक लोकांनी हा फोटो शेअर केला आहे. या मुलाच्या एका हातात पैसे आणि दुसऱ्या हातात कोंबडीचे पिल्लू बघून डॉक्टर देखील अवाक झाले. या मुलाच्या निरागसतेचे सोशल मीडियावर प्रचंड कौतूक होत असून, या घटनेची दखल त्याच्या शाळेने देखील घेतली आहे. तो शिकत असलेल्या शाळेने या मुलाचा सत्कार केला असून, शाळेने सत्कार केलेला फोटो देखील व्हयरल होत आहे.

 

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here