घरदेश-विदेशकाँग्रेसच्या रक्तातच ब्राम्हणांचा डीएनए - रणदीप सुरजेवाला

काँग्रेसच्या रक्तातच ब्राम्हणांचा डीएनए – रणदीप सुरजेवाला

Subscribe

चंदीगड : भाजपला ब्राम्हणांचा पक्ष संबोधणार्‍या काँग्रेसने आता थेट ब्राम्हणांनाच कुरवाळण्याची नीती अवलंबली आहे. काँग्रेस पक्ष थेट ब्राम्हणांना आरक्षण देणार आहे. इतकंच नव्हेतर काँग्रेसच्या रक्तातच ब्राम्हणांचा डीएनए आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हा नवा शोध लावला आहे. हरियाणामध्ये ब्राम्हण समाजाच्या संमेलनाला संबोधित करताना सुरजेवाला म्हणाले की, काँग्रेस हा एक असा पक्ष आहे की ज्याच्या रक्तातच ब्राम्हणांचा डीएनए आहे. काँग्रेस सत्तेत आल्यावर ब्राम्हणांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करील.

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो, तिरंगा आणि काँग्रेस पक्षाच्या झेंड्यासोबत ब्राम्हण संमेलनाचं आयोजन का केले जात आहे, अशी विचारणा माझ्या एका सहकार्‍याने केली. मी त्याला सांगितले की त्याचे उत्तर एक दिवस व्यासपीठावरुन देईन. काँग्रेस असा पक्ष आहे, ज्याच्या रक्तातच ब्राम्हण समाजाचा डीएनए आहे, असे सुरजेवाला म्हणाले.

आगामी निवडणुकीत ब्राम्हणांनी काँग्रेसला मतदान करावे, असे आवाहन सुरजेवाला यांनी ब्राम्हण समाजाला केले. शिवाय हरियाणामध्ये सत्ता आल्यास ब्राम्हण विकास महामंडळाची स्थापना करु, असेही ते म्हणाले. सत्ता आल्यास ब्राम्हण समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन सुरजेवाला यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -