घरदेश-विदेशदहशतवाद्यांचा सामना करणाऱ्या १४ वर्षीय इरफानला ‘शौर्य चक्र’पुरस्कार

दहशतवाद्यांचा सामना करणाऱ्या १४ वर्षीय इरफानला ‘शौर्य चक्र’पुरस्कार

Subscribe

जम्मू-काश्मीरमधील त्याच्या राहत्या घरावर दहशतवाद्यांनी दोनवर्षापुर्वी केलेल्या हल्ल्यास वयाच्या १४ व्या वर्षी हाणून पाडला होता.

राष्ट्रपतीभवनात मंगळवार, १९ मार्च रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शौर्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी लष्काराचे जवान, अधिकारी आणि शहीद जवांनाच्या पत्नीला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार विजेत्यांमध्ये जम्मू-काश्मीरमधील १६ वर्षाच्या इरफान रमजान शेख मुलाचाही समावेश होता . जम्मू-काश्मीरमधील त्याच्या राहत्या घरावर दहशतवाद्यांनी दोनवर्षापुर्वी केलेल्या हल्ल्यास वयाच्या १४ व्या वर्षी हाणून पाडला होता.

- Advertisement -

इरफानच्या धाडसाचे कौतुक

इरफानचे वडील रमजान शेख हे जम्मू-काश्मीरमधील पिपल्स डेमोक्रेटीक पार्टीचे स्थानिक नेते तसेच माजी सरपंच आहेत. २०१७ साली रात्री तीन दहशतवाद्यांनी शेख यांच्या घरास वेढा घातला. त्यावेळी इरफानने घराचा दरवाजा उघडला असता घराबाहेर बंदूका आणि ग्रेनेड घेऊन उभे असलेले तीन दहशतवादी त्याला दिसले. ते घराच्या दरवाजाच्या दिशेने चालत येत असताना इरफानने प्रसंगावधान दाखवले. त्या दहशतवाद्यांना घरात येण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला. याच झटापटीमध्ये इरफानचे वडील घराबाहेर पडले असता एका दहशतवाद्यांने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये रमजान शेख गंभीररित्या जखमी झाले. आपल्या वडीलांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहूनही इरफान न घाबरता त्यांच्यावर गोळीबार केलेल्या दहशतवाद्यावर तुटून पडला. इरफान हाती लागेल त्या गोष्टीने दहशतवाद्याला मारत सुटला. इरफानने केलेल्या हल्ल्यामध्ये तो दहशतवादी गंभीर जखमी होऊन मरण पावला. इरफानचे ते रुप पाहून बाकी दोन दहशतवाद्यांनी तेथून धूम ठोकली. इरफान त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे धावला पण ते दोघे आपल्या साथीदाराचा मृतदेह तेथेच सोडून पळून गेले.

१४व्या वर्षी दाखवलेल्या शौर्यासाठी पुरस्कार

सामान्यपणे शत्रूविरुद्ध लढताना असामन्य शौर्य दाखवणाऱ्या जवनांना शौर्य चक्र पुरस्कार प्रदान केला जातो. मात्र इरफानने लहान वयात दाखवलेल्या शौर्यासाठी त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या हल्ल्यामध्ये रमजान गंभीर जखमी झाले तरी इरफानने दाखवलेल्या हिंमतीमुळे त्याच्या कुटुंबियांचे प्राण वाचले. आता इरफान दहाव्या इयत्तेत शिकत असून भविष्यात त्याला सनदी अधिकारी होण्याची इच्छा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -