घरदेश-विदेशVideo: ४० फुटांवरून पडला; तरीही जिवंत राहिला!

Video: ४० फुटांवरून पडला; तरीही जिवंत राहिला!

Subscribe

तब्बल ४० फुटांवरून पडून देखील एक फुटबॉल प्रेमी जिवंत राहिल्याची आश्चर्यकारक घटना ब्राझीलमध्ये घडली आहे.

४० फूट म्हणजे साधारण आपल्याकडच्या इमारतीच्या किमान ५ मजल्यांइतक्या उंचीवरून जर कुणी खाली पडलं, तर अशा परिस्थितीत संबंधित व्यक्ती दगावण्याचीच सर्वाधिक शक्यता असते. पण ब्राझीलमध्ये अशी एक घटना घडली आहे, ज्यात एख व्यक्ती ४० फूट उंचावरून खाली पडली. मात्र, तरीही एका सामान्य फ्रॅक्चरशिवाय इतर कोणतीही इजा या व्यक्तीला झाली नाही. इतकंच नाही, तर ही व्यक्ती ज्या दोघांवर पडली, त्यामध्ये एका १३ वर्षांच्या मुलीचा देखील समावेश होता. मात्र, या अपघातामध्ये या दोघांना देखील इजा झालेली नाही. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांकडूनच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नाचत रेलिंगवर चढला आणि खाली पडला!

ही घटना घडली आहे ब्राझीलच्या साओ पाओलोमधल्या इस्टेडिओ सिसेरो पॉम्पे डी टोलेडो स्टेडियममध्ये! साओ पाओलो आणि ग्रॅमिओ या दोन स्थानिक प्रसिद्ध फुटबॉल संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. स्टेडियममध्ये दुसऱ्या मजल्यावर बसलेला २३ वर्षीय लागो डी मेलो रिओस मॅच पाहण्यात आणि एन्जॉय करण्यात इतका दंग होता, की त्याला कळलंच नाही की आपण मजल्याच्या रेलिंगवर येऊन सेलिब्रेट करत आहोत. या काठावर आलेल्या लागोचा तोल गेला आणि तो थेट ४० फुटांवरून सगळ्यात खाली खुर्च्यांवर बसलेल्या दोन प्रेक्षकांवर आदळला.

- Advertisement -


हेही वाचा – अजबच! मुंबईत पिन न टाकताच ATMमधून आले ९६ हजार रुपये!

१३ वर्षांची मुलगी सुखरूप!

अपघात झाल्यानंतर आसपासच्या प्रेक्षकांनी लगेच या तिघांकडे धाव घेतली आणि समोर दिसलेल्या दृश्यांमुळे त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला! लागो स्वत: इतक्या उंचावरून पडून देखील जिवंत होता! त्याहून विशेष म्हणजे तो ज्या दोघांवर आदळला, त्यातल्या १३ वर्षांच्या मुलीला कोणतीही इजा झाली नाही. त्याशिवाय दुसऱ्या पुरुषाला फक्त मांडीच्या हाडाला दुखापत झाली होती. या तिघांनाही लागलीच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, या अविश्वसनीय प्रकारावर पुढच्या सामन्यादरम्यान बरीच चर्चा रंगली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -