घरदेश-विदेशथायलंडमध्ये स्तन प्रत्यारोपण फसले; मुंबईत केली यशस्वी शस्त्रक्रिया

थायलंडमध्ये स्तन प्रत्यारोपण फसले; मुंबईत केली यशस्वी शस्त्रक्रिया

Subscribe

थायलंडमध्ये एका महिलेवर तिथल्याच एका खासगी रुग्णालयात स्तन प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. परंतू या शस्त्रक्रीयेमुळे महिलेचा जीव पणाला लागल्यानंतर त्यांनी मुंबईत धाव घेत येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले.

थायलंडच्या ४४ वर्षीय महिलेवर तिथल्याच एका खासगी रुग्णालयात स्तन प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. पण, ही सर्जरी तिला भलतीच महागात पडली. सिलीकॉन इंजेक्शन देऊन करण्यात आलेल्या सर्जरीमुळे या महिलेचा जीवही जाऊ शकला असता. पण, मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ती वेळीच आल्याने येथील डॉक्टरांनी तिच्यावर अचूक उपचार करत तिचा जीव वाचवला.

वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी धाव

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये या महिलेने उपचारांसाठी धाव घेतली असता, स्तन प्रत्यारोपणाच्या नावाखाली थायलंड येथील डॉक्टरांकडून तिची फसवणूक करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेनंतर चार महिन्यानंतर तिचे स्तन लाल, रंगहीन आणि आकाराने वाढल्याचे लक्षात आले. तिने फॉलो अपसाठी पुन्हा त्या क्लिनिकला भेट दिली तेव्हा तिला समजले की क्लिनिक बंद झाले आणि डॉक्टर देखील गायब झाले.

- Advertisement -

या प्रकरणात महिलेचे स्तन प्रत्यारोपण न करता तिला सिलीकॉन इंजेक्शन देण्यात आले, आणि असे करणे त्या महिलेच्या आरोग्यासाठी धोकादायक होते. शिवाय, महिलेला जीव देखील गमवावा लागला असता. पण, अचूक उपचारांमुळे हा धोका टळला. सिलीकॉन इंजेक्शनमुळे शरीरावर होणारे घातक परिणाम पाहता एफडीएने यावर कायदेशीर बंदी आणली आहे.
– डॉ. मेघल संघवी, ऑनकोलॉजीस्ट, वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल

अशा प्रकरणात या महिलेला कॅन्सर होण्याची शक्यता होती. स्तनामधील सिलीकॉनच्या लहान तुकड्यांना काढून टाकणे अशक्य असल्याने स्तन पुननिर्मितीचा पर्याय वापरण्यात आला. त्यामुळे महिलेच्या जीवाला असलेला धोका आता पुर्णपणे टळला आहे. 
– डॉ. भाग्यम नागराजन, रेडिओलॉजीस्ट, कन्सलटंट, वोक्हार्ट रुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -