घरट्रेंडिंगVideo : जवानांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; पुलवामाची पुनरावृत्ती टळली!

Video : जवानांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; पुलवामाची पुनरावृत्ती टळली!

Subscribe

लष्कर, सीआरपीएफ आणि पुलवामा पोलिसांनी एकत्ररित्या या गाडीची ओळख पटवली. तसंच या गाडीत IED असल्याचा शोधही घेतला.

भारतील लष्कराच्या जवानांच्या सतर्कतेमुळे पुलवामासारख्या हल्ल्याची योजना टळली आहे. पुलवामाजवळ एक सॅन्ट्रो गाडीमध्ये IED (इंम्प्रोव्ह्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) बसवण्यात आले होते. पण हे बाँम्ब निकामी करणाऱ्या पथकानं वेळेत हा बॉम्ब निक्मी केल्याने मोठा अनर्थ टळला.

- Advertisement -

लष्कर, सीआरपीएफ आणि पुलवामा पोलिसांनी एकत्ररित्या या गाडीची ओळख पटवली. तसंच या गाडीत IED असल्याचा शोधही घेतला. त्यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाला त्वरित घटनास्थळी बोलावण्यात आलं. त्यानंतर बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकानं त्वरित तो बॉम्ब निकामी केला आणि मोठा अनर्थ टाळला. पुलवामाजवळ राजपुरा रोडजवळ शादिपुरा ही कार पकडण्यात आली. पांढऱ्या रंगाच्या या गाडीला दुचाकीची नंबर प्लेट लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही गाडीची कठुआमध्ये नोंदणी केल्याची माहितीही समोर आली आहे.

- Advertisement -

हा गाडी एख दहशतवादी चालवत होता. परंतु गोळीबारानंतर तो गाडी सोडून पळून गेला. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही गाडी ट्रॅक केली आणि त्यानंतर यात बॉम्बचा शोध घेण्यात आला. बॉम्ब निकामी करण्यापूर्वी जवळपासचा परिसरही रिकामा करण्यात आला होता. दरम्यान, हे प्रकरण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जवळपास ४५ जवान शहीद झाले होते.


हे ही वाचा – झोयाने पुन्हा केलं प्लाझ्मा डोनेट, आदित्य ठाकरेंनी ट्विट करून केलं कौतुक!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -