घरदेश-विदेशउत्तराखंडमध्ये नदीवरील पुल कोसळला; दोन जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये नदीवरील पुल कोसळला; दोन जणांचा मृत्यू

Subscribe

स्थानिक पोलीस आणि जवान आणि बचाव कार्य करणारी टीम घटनास्थळी दाखल झाली असून १०० फूट खोल असलेल्या नदीमध्ये रेस्क्यू कार्य सुरु आहे. हा पूल ११५ वर्ष जुना असल्याचे सांगितले जात आहे.

उत्तराखंडमध्ये नदीवरील पुल कोसळला. देहराडूनमध्ये आज पहाटे ५ वाजता ही घटना घडली आहे. बीरपूरमधील टौंस नदीवरील लोखंडाचा पूल कोसळला. या दुर्घटनेमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पुलाच्याखाली डंपर आणि काही वाहने अडकली आहेत. पूल कोसळल्याने या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक पोलीस आणि जवान आणि बचाव कार्य करणारी टीम घटनास्थळी दाखल झाली असून १०० फूट खोल असलेल्या नदीमध्ये रेस्क्यू कार्य सुरु आहे. हा पूल ११५ वर्ष जुना असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११५ वर्ष जुना असलेल्या या पुलावरुन आज पहाटे रेतीने भरलेला डंपर जात होता. त्या दरम्यान पूल कोसळला. या दुर्घटनेमध्ये पुलावरुन जाणाऱ्या डंपरसह अनेक वाहने नदीत कोसळली. या घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या रेस्क्यू टीमने आतापर्यंत २ जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. काही दिवसापूर्वी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी या पुलाच्या ठिकाणी नवा पुल बांधण्यासाठी भूमीपुजन करण्यात आले होते. दोन दिवसामध्ये नव्या पुलाचे काम सुरु होणार होते. त्याआधीच या पुलावर मोठी दुर्घटना घडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -