घरताज्या घडामोडीPfizer Vaccine: कोरोना लसीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिलाच देश

Pfizer Vaccine: कोरोना लसीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिलाच देश

Subscribe

कोरोना लसीसंदर्भात सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी

जगभरातील नागरिक कोरोनाच्या लसीची आतुरतेनं वाट पाहात असताना दुसरीकडे युरोपातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट देखील आली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतल्या लस बनवणाऱ्या दोन कंपन्यांनी अवघ्या जगाला दिवाळीनिमित्त मोठा दिलासा देणारी बातमी दिली आहे. रविवारी फायजर कंपनीने त्यांची लस कोरोनावर ९० टक्के प्रभावी असल्याचा दावा केला असतानाच ब्रिटनकडून कोरोनावरील फायझर लसीला मंजुरी देण्यात आली आहे. तर कोरोना लसीला मंजुरी देणारा ब्रिटन पहिलाच देश ठरला आहे.

- Advertisement -

दरम्यान, फायझरची लस ९५ टक्के प्रभावी असल्याचा अहवाल देखील कंपनीने सादर केला होता. कोरोनाने जगभर कहर केला असताना त्यानंतर फायझर लसीला ब्रिटनने दिलेली मंजुरी ही सकारात्मक बातमी असल्याचे म्हणता येईल. तर ब्रिटनने Pfizer-BioNTech लसीच्या वापराला पुढच्या आठवड्यापासून मंजुरी दिली आहे.

मंजुरी मिळालेली लस ९५ टक्के प्रभावी

ब्रिटनच्या प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये मंजुरी मिळालेली लस ही ९५ टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. या लसीचा वापर सर्वप्रथम रुग्णांवर केला जाणार असल्याचे ब्रिटनच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यानंतर ब्रिटनने आपल्या २० दशलक्ष लोकसंख्येसाठी प्रत्येकी दोन डोस असे ४० दशलक्ष डोसची मागणी केली आहे. यातील १० दशलक्ष डोस येत्या काहीच दिवसात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपूर्वी अमेरिकेतील फायझर या औषध कंपनीने दावा केला आहे की, कोरोनावरील लस ९० टक्के प्रभावी असून फायझर आणि जर्मन बायोटेक्नॉलॉजी फर्म BioTech यांनी विकसित केलेली कोरोना व्हायरस लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे आधी दिसत नव्हती त्यांच्यावर ही लस प्रभावी ठरली आहे, असं कंपनीने म्हटले आहे. Pfizer कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोरला म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये आमच्या लसीची कोविड -१९ रोखण्याची क्षमता दिसली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -