घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटVaccine येवो वा न येवो, Corona कधीही संपणार नाही; ब्रिटनच्या ज्येष्ठ वैज्ञानिकानं...

Vaccine येवो वा न येवो, Corona कधीही संपणार नाही; ब्रिटनच्या ज्येष्ठ वैज्ञानिकानं केलं स्पष्ट!

Subscribe

आख्खं जग कोरोनासारख्या महाभयंकर आजाराशी लढा देत असताना सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे कोरोना कधी जगातून हद्दपार होईल याची. यासाठी सगळं जग आतुरतेनं कोरोनावरच्या प्रभावी Corona Vaccine ची वाट पाहात आहे. कोरोना लसीमुळे कोरोनाचा विषाणू मरेल आणि जग पुन्हा पूर्वीसारखं कोरोनामुक्त होईल अशी अपेक्षा सगळ्यांना आहे. मात्र, ब्रिटनची सर्वोच्च अशी साइंटिफिक एडवायजरी ग्रुप फॉर इमर्जन्सी (SAGE) अर्थात राष्ट्रीय आपात्कालीन वैज्ञानिक सल्लागार मंडळाचे ज्येष्ठ सदस्य असलेल्या जॉन एडमंड्स (John Edmunds) यांनी जगाला ही अपेक्षा न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना कधीही संपणार नाही, त्यामुळे आपल्याला पृथ्वीच्या अंतापर्यंत कोरोनासोबतच जगायचं आहे, लस आली किंवा नाही यामुळे त्यात काहीही फरक पडणार नाही, असं जॉन एडमंड यांनी स्पष्ट केलं आहे.

संक्रमण रोखा, व्हायरस जाणार नाही!

जॉन एडमंड्स म्हणाले, ‘कोरोना पूर्णपणे संपण्याची शक्यता खूपच नगण्य आहे. त्यामुळे आपल्याला कायमस्वरूपी Corona Virus सोबत जगायचं आहे. आपण जर यावरची लस बनवण्याच्या फार जवळ पोहोचलो असलो, तर आपण याचा संसर्ग शक्य तितका मर्यादित करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण व्हायरस समूळ नष्ट होणं जवळ जवळ अशक्य आहे.’

- Advertisement -

ब्रिटनमध्ये Corona ची दुसरी लाट

ताज्या आकडेवारीनुसार सध्या जगभरात ४ कोटी १५ लाख ८८ हजार १९८ कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यासोबत ११ लाख ३७ हजार ८०४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आत्तापर्यंत १ कोटी ९ लाख ६० हजार ४११ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. ब्रिटनचा विचार करता सध्या ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून त्यामुळे पुन्हा एकदा सामाजिक जीवनामध्ये अनेक गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत.


हेही वाचा – Good News: लवकरच येणार कोरोनाची लस; डिसेंबरपर्यंत Moderna लसीला मिळणार मंजूरी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -