‘त्या’ ब्रिटिश तरुणीच्या हत्येप्रकरणी अखेर सॅमसन डिसोझाला कैद

ब्रिटिश नागरिक असलेल्या स्कार्लेट कीलिंगवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी तब्बल ११ वर्षांनंतर अखेर आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शिक्षा सुनावली आहे.

Panaji
scarlett keeling
स्कार्लेट कीलिंग

गेल्या अनेक वर्षांपासून गोवा आणि महाराष्ट्रात कायदेशीर लढ्यासाठी गाजलेल्या स्कार्लेट कीलिंग बलात्कार आणि हत्या प्रकरणी अखेर आरोपी सॅमसन डिसोझाला शिक्षा झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर या संदर्भात सुनावणी सुरू होती. त्यावेळी न्यायालयाने आरोपी डिसोझाला १० वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. मात्र, यावेळी दुसरा आरोपी प्लॅसिडो कार्वाल्होची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल ११ वर्षांनंतर या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

काय घडलं होतं १० वर्षांपूर्वी?

ब्रिटिश नागरीक असलेली स्कार्लेट कीलिंग तिच्या कुटुंबासह गोव्यात सुट्टीसाठी आली होती. मात्र, १७ फेब्रुवारी २००८ रोजी स्कार्लेटवर निर्दयपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी स्कार्लेटच्या आईने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, २०१६मध्ये या प्रकरणात पुरेशा पुराव्यांच्या अभावी कनिष्ठ न्यायालयाने या दोघा आरोपींची निर्दोष सुटका केली होती. त्यानंतर हार न मानता स्कार्लेटच्या आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडे दाद मागितली. यासंदर्भात २ वर्ष लढा दिल्यानंतर आज अखेर न्यायालयाने त्यातल्या सॅमसन डिसोझाला शिक्षा सुनावली आहे.


हेही वाचा – नराधम मामाचा सहा वर्षीय भाचीवर अमानुष बलात्कार

गोवा पोलिसांची संशयास्पद भूमिका

दरम्यान, गंभीर बाब म्हणजे तपास करताना गोवा पोलिसांनी देखील स्कार्लेटचा मृत्यू अपघाताने पाण्यात बुडून झाल्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याविरोधात स्कार्लेटची आई आणि तिच्या नातेवाईकांनी आवाज उठवला होता. त्यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी मोर्चे देखील काढले होते. तेव्हा वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण गोवा पोलिसांकडून सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here