सख्खा भाऊ पक्का वैरी! ‘कोंबडी चोर’ म्हणतं असल्यामुळे केला भावाचा खून

brother killed brother calling him murgi chor amroha in up
सख्खा भाऊ पक्का वैरी! 'कोंबडी चोर' म्हणतं असल्यामुळे केला भावाचा खून

सख्खे भाऊ, बहीण असून देत किंवा मित्र-मैत्रीण आपण नेहमी कोणाला तरी टोमण नावानं बोलवतं असतो. पण अशाप्रकारे बोलवणं कधी कोणाच्या जीवावर बेतेल हे सांगू शकतं नाही. असं काहीस उत्तर प्रदेशमध्ये घडलं आहे. दोन सख्खा भावांनी आपला भाऊ ‘कोंबडी चोर’ बोलत असल्यामुळे त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खून करण्यासाठी दोन सख्या भावांनी चुलत भावाची मदत घेतली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांही अटक केली आहे.

नक्की काय घडले?

एक तरुण आपल्या सख्या भावांना ‘कोंबडी चोर’ बोलत होता. पण ‘कोंबडी चोर’ बोलणं त्या तरुणाला महागात पडलं आहे. आपला सख्खा भाऊ ‘कोंबडी चोर’ बोलत असल्यामुळे दोन भावांनी एकाचुलत भावाच्या मदतीने त्याच्या खूनाचा कट रचला. आरोपींनी पहिल्यांदा भावाला पोलने मारहाण करून जखमी केले आणि त्यानंतर टॉवेलने त्याचा गळा दाबून त्याला जागीच ठार मारले. या खूनानंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

त्यानंतर तरुणाचा मृतदेह एका बागेत आढळला. तेव्हा मृत तरुणाच्या पत्नीने पोलीसात एफआयआर दाखल केला. त्यानंतर शोध कार्याला सुरुवात झाले. या तरुणाचा खून सख्ख्या भावांनी केला असल्याचे तपासादरम्यान समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून मृत तरुणाचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. ज्या पोलच्या सहाय्याने तरुणाला मारण्यात आले आणि ज्या टॉवेलने त्याचा गळा दाब्यात आला या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. एसपी अजय प्रताप सिंह यांनी सांगितले की, ‘याप्रकरणी अमरोहा नगर पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला. यामध्ये मृत व्यक्तीच्या पत्नीने सांगितले की, तिचा नवरा संध्याकाळी ४ वाजता घरातून निघून गेला होता आणि तो त्यानंतर घरी परतलाच वागी. नंतर त्याचा मृतदेह बागेत आढळला.’

तपासात दोन सख्ख्या भावांनी आणि चुलत भावाने त्याच्यावर पोलने वार करून त्याचा गळा दाबला असल्याचे समोर आले. मृत तरुण आपल्या सख्खा भावांना ‘कोंबडी चोर’ म्हणत होता. ८ वर्षांपूर्वी आरोप चुलत भावाच्या वडिलांना मृत तरुणाने मारहाण केली होती. याचा बदला घेण्यासाठी या तिघांनी भावाचा खून केला.


हेही वाचा – ‘या’ व्यक्तीने शंभर खोल्यांमध्ये ३९ बायकांबरोबर थाटलाय संसार!