बीएसएफचा ‘तो’ जवान मोदींविरोधात निवडणूकीच्या रिंगणात

बीएसएफचा बडतर्फ जवान तेज बहादूर यादव हा येत्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढणार आहे. सुरक्षा दलतील भ्रष्टाचार संपवण्याच्या इराद्याने ते निवडणूक लढणार आहेत.

Mumbai
bsf jawan

बीएसएफ जवानांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवणावरून सरकारवर टीका केल्यामुळे बडचर्फ करण्यात आलेला माजी बीएसएफ जवान तेज बहादूर यादव हा येत्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढणार आहे. यादव हा अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. बीएसएफच्या जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवले जात असल्याचा व्हीडीओ व्हारल केल्यामुळे दोन वर्षांपूर्वी तेज बहादूर यांच नाव चर्चेत आलं होतं.

वाराणसी मतदार संघातून लढणार निवडणूक

तेज बहादूर यादव हे मूळचे हरियाणाचे रहिवासी आहेत. त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना निवडणूक लढवणास असल्याचं सांगितलं. उत्तरप्रदेशच्या वाराणसी मतदारसंघातून  निवडणूक लढवणार आहे. याच मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार आहेत. सुरक्षा दलतील भ्रष्टाचार संपवण्याच्या इराद्याने मी निवडणूक लढवणार आहे. मी सेवेत असताना भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. पण मला बडतर्फ करण्यात आलं. त्यामुळे ही निवडणूक मोदींविरोधात लढवणार असल्याचं तेज बहादूर यांनी यावेळी सांगितलं.

त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांच्या नावाने मत मागतात पण त्यांच्यासाठी त्यांनी काहीही केलेले नाही. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना शहीदांचा दर्जा देखील सरकारने दिलेला नाही’ अशी टीका त्यांनी यावेळी मोदींवर केली.

म्हणून झाली होती तेज बहादूर यांच्यावर निलंबनाची कारवाई

तेज बहादूर यादव यांनी फेसबुकवरून व्हिडीओ शेअर करत बीएसएफच्या जवानांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या जेवण सगळ्यांसमोर आणलं होतं. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. या चौकषीत दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here