घरदेश-विदेशचुकून भाजपला मतदान केलं; बसपा कार्यकर्त्याने स्वत:चं बोटच छाटलं

चुकून भाजपला मतदान केलं; बसपा कार्यकर्त्याने स्वत:चं बोटच छाटलं

Subscribe

बहुजन समाजवादी पक्षाचं समर्थन करणारा एक तरुण गुरुवारी मतदानासाठी गेला होता. मात्र त्याच्याकडून चुकून बीएसपी ऐवजी बीजेपीला मतदान केले गेले. त्यामुळे रागात त्याने स्वत:चं बोट छाटलं.

मतदान हा देशातील सर्वसामान्य व्यक्तीच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकशाही टिकावी म्हणून काही नागरिक आवर्जून मतदान करतात. मतदान बूथवर जावून कित्येक तास रांगेत उभेही राहतात. त्यामुळे लोकशाही अबाधितपणे जिवंत राहते. यासोबतच आपल्या आवडत्या पक्षाचा उमेदवार निवडूण यावा यासाठी काही लोक मतदानासाठी जातात. उत्तर प्रदेशचा असाच एक अवलिया मतदानासाठी गेला होता. तो मायावतींच्या बहुजन समाजवादी पक्षाचा (बीएसपी) समर्थक आहे. तो बीएसपीलाच मतदान करण्यासाठी गेला होता. मात्र चुकून त्याचा बोट बीएसपीच्या ऐवजी बीजेपीवर पडला आणि भारतीय जनता पार्टीला मतदान केलं गेलं. त्यामुळे त्याला फार मनस्ताप करावा लागला आणि त्याने या मनस्तापातून स्वत:चा बोट कापून घेतला.

काय आहे नेमकं प्रकरण?

गुरुवारी देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं. देशभरातील एकूण ९७ जागांसाठी हे मतदान संपन्न झालं. या दरम्यान, बहुजन समाजवादी पक्षाला (बीएसपी) मतदान करण्यासाठी गेलेल्या एका बीएसपी समर्थकाकडून चुकून कमळचं बटण दाबलं गेलं आणि भारतीय जनता पार्टीला मतदान केलं गेलं. त्यामुळे या मतदाराने निराश होऊन स्वत:चा बोट कापून घेतला. आपल्याकडून झालेल्या चुकीचं हे प्रायचित्त आहे, असं त्याचं मत आहे. या व्यक्तीचे नाव पवन कुमार असून तो २५ वर्षांचा आहे. तो अबदुल्लापूर हुलसन या गावाचा रहिवाशी आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यातील शिखरपूर येथील मतदानाच्या बुथवर त्याने मतदान केलं. मात्र, बीएसपीला मतदान न करता आल्यामुळे त्याने रागात स्वत:चा बोट कापून घेतला.

- Advertisement -

व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल

पवन कुमारचा या संदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामध्ये तो आपल्या मनस्तापाची कहानी सांगत आहे आणि आपला तुटलेला बोटही व्हिडिओमध्ये दाखवत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -