घरदेश-विदेशBudget 2019 : मोदी सरकार २०२२ पर्यंत 'हे' पाच महत्त्वपूर्ण कामे करणार

Budget 2019 : मोदी सरकार २०२२ पर्यंत ‘हे’ पाच महत्त्वपूर्ण कामे करणार

Subscribe

मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्रातील पहिला अर्थसंक्लप सादर झाला आहे. या अर्थसंकल्पातील काही योजना २०२२ पर्यंत पूर्ण करण्यचे लक्ष्य भारत सरकारचे आहे.

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्रातील पहिले अर्थसंकल्प सादर केले. या अर्थसंकल्पात सीतारमण यांनी बऱ्याच मोठमोठ्या योजनांच्या घोषणा केल्या आहेत. यापैकी पाच योजनांसाठी मोदी सरकारने २०२२ सालाचे लक्ष्य धरले आहे. त्यामुळे या योजना तीन वर्षांपर्यत चालणार आहेत. या पाचही योजना फार महत्त्वाच्या आहेत.

१. देशातील गरिबांसाठी १.९५ कोटी घरे बांधणार

निर्मला सीतारमण यांनी सांगितल्यानुसार २०२२ पर्यंत मोदी सरकार गरिबांसाठी १.९५ कोटी घरे बांधणार आहेत. या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक गरिब कुटुंबाला घर दिले जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गतील घरे बांधण्यासाठी ३१४ दिवस लागतात. मात्र, आता फक्त ११४ दिवसात घरे बांधून दिले जातील, असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले.

- Advertisement -

२. घराघरांपर्यंत वीज

वीज अतिशय जीवनाश्मक आहे. मात्र, अजुनही देशातील कित्येक गावांपर्यंत वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक गाव आणि शहरांमधील घराघरांपर्यंत वीज दिली जाईल, असे आश्वासन सीतारमण यांनी दिले आहे.

३. घराघरांत LPG कनेक्शन

निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, उज्ज्वल गॅस योजनेअंतर्गत गावाभागात LPG कनेक्शन दिले जात आहे. २०२२ पर्यंत देशातील सर्व घरांना LPG कनेक्शन देण्याचे लक्ष्य भारत सरकारचे आहे.

- Advertisement -

४. प्रवाशांना रेल्वेसाठी ताटकळत उभे राहावे लागणार नाही

निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, रेल्वे गाड्यांसाठी सर्वसामान्य प्रवाशांना तासंतास वाट पाहावी लागणार नाही. कारण फ्रेट कॉरिडोअरचे काम पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याचे लक्ष्य सरकारचे आहे.

५. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार

शेतीमालाला दुप्पट भाव मिळण्यासाठी मोदी सरकार गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करत असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. २०२२ पर्यंत शेतीमालाला दुप्पट भाव मिळवून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.


हेही वाचा – Budget 2019 : भारत सरकार गरिबांसाठी कोट्यवधी घरे बांधणार

हेही वाचा – Budget 2019 : महिला आणि विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात ‘या’ तरतूदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -