कर्नाटकमध्ये इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, १०० पेक्षा जास्त जखमी

कर्नाटकमध्ये इमारत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत १०० पेक्षा जास्त जण जखमी असल्याची बाब समोर येत आहे.

Bangalore
building collapse in Karnataka
कर्नाटकमध्ये इमारत कोसळली; १०० पेक्षा जास्त जखमी

कर्नाटकातील बंगळुरु येथे इमारत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. धारवाडमधल्या कुमारेश्वरनगरमध्ये ही घटना घडली आहे. इमारतीचे बांधकाम सुरु असताना ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १०० पेक्षा जास्त लोक जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरु आहेत.

प्रशासनाचे शर्थीने प्रयत्न सुरु

ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. जिल्हाधिकारी दिपा चोलन, पोलीस प्रशासन आणि अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले आहे. अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या, ४ जेसीबी आणि १० अॅम्ब्युलन्स गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेतील जखमी रुग्णांना परिसरातील जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटना झालेली इमारती ही काँग्रेसचे माजी आमदार विनय कुलकर्णी यांच्या नातेवाईकांची आहे.

ही धक्कादायक घटना – कुमारस्वामी

या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन म्हटले आहे की, धारवडमध्ये बांधकाम इमारतीचे कोसळणे, ही धक्कादायक बाब आहे. मी मुख्यसचिवाला रेस्क्यू ऑपरेशन आदेश दिले आहेत. त्याचबरोबर बचावकार्यासाठी विशेष पथकाची रवानगी फ्लाईटमार्फत करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here