घरदेश-विदेशबुलंदशहर हिंसाचार; 'धक्कादायक' व्हिडीओ आला समोर

बुलंदशहर हिंसाचार; ‘धक्कादायक’ व्हिडीओ आला समोर

Subscribe

उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या संशयावरून झालेल्या उद्रेकाचा धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जमाव मारो, बंदुक ले लो' असं ओरडताना दिसत आहे.

उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये गोहत्येच्या संशयावरून झालेल्या उद्रेकाचा धक्कादायक व्हिडीओ आता समोर आला आहे. एनडी टिव्ही या वृत्तवाहिनीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. जवळपास २० सेकंदाचा हा व्हिडीओ असून यामध्ये जमाव आणि पोलिसांमध्ये झालेला संवाद समोर आला आहे. आक्रमक झालेला जमाव हा पोलिसांच्या अंगावर धावून  जात असून ‘मारो, बंदुक ले लो’ असं ओरडताना दिसत आहे. शिवाय, यामध्ये एका युवकासह पोलिस निरिक्षकाचा देखील मृत्यू झाला होता. दरम्यान, समोर आलेल्या व्हिडीओमध्ये जमाव पोलिसांवर धावत जात असून यामध्ये एका तरूणाला गोळी लागल्याचं देखील दिसत आहे. पण, ही गोळी कुणी झाडली याबाबत कोणतंही चित्रण झालेलं नाही. यानंतर जखमी तरूणाला जमाव दवाखान्यामध्ये नेताना देखील दिसत आहेत. शिवाय, पोलिस अधिकारी देखील मृत झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, २० सेकंदाच्या या  व्हिडीओमधील सर्वच गोष्टी स्पष्ट होताना दिसत नाहीत.

वाचा – बुलंदशहरमधील हिंसाचाराचा मुख्य आरोपी अटकेत

काय आहे प्रकरण

उत्तरप्रदेशातील बुलंद शहरामध्ये गोहत्या झाल्याची अफवा उठली. त्यानंतर उद्रेक उडाला. यावेळी जमाव आणि पोलिसांमध्ये धुमचक्री झाली. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन केलं. वाहनांची तोडफोड केली. तसेच पोलिस स्टेशनवर हल्ला केला. पोलिस स्टेशनबाहेरील गाड्या देखील पेटवून दिल्या गेल्या. यावेळी पोलिस स्टेशनवर गोळीबार देखील केला गेला. यादरम्यान एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला. सुबोध कुमार सिंह असं या पोलिस निरीक्षकाचं  नाव आहे. यानंतर कारवाई करत पोलिसांनी ८७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तर, दंगलीमागील मुख्य सुत्रधार योगेश राज या तरुणाला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. योगेश सोबतच पोलिसांनी त्याच्या तीन सहकाऱ्यांना अटक केली आहे. योगेश राज हा बजरंग दलाचा नेता असून तो प्रवीण तोगडीया यांच्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे.

वाचा – गोहत्येच्या संशयावरून उद्रेक, पोलिस निरिक्षकाचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -