Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पंतप्रधानांचे खास निकटवर्तीय अरविंदकुमार शर्मांची राजकारणात एन्ट्री

पंतप्रधानांचे खास निकटवर्तीय अरविंदकुमार शर्मांची राजकारणात एन्ट्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास निकटवर्तीय अरविंदकुमार शर्मांची राजकारणात एन्ट्री.

Related Story

- Advertisement -

गुजरात कॅडरचे १९८८ बॅचचे आयएएस अधिकारी अरविंदकुमार शर्मा यांनी अचानक व्हीआरएस घेतल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, त्यांनी व्हीआरएस घेतल्यानंतर लगेचच विधानपरिषद निवडणुकीत सक्रीय झाल्याने राजकारणात प्रवेश करणार अससल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास निकटवर्तीय असल्याने भाजप त्यांना विधानपरिषदेवर पाठविणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे कोणती मोठी जबाबदारी सोपवणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारमधील बड्या नेत्यांमध्ये अस्वस्था असल्याचे दिसून येत आहे.

शर्मा युपीचे उपमुख्यमंत्री बनणार?

अरविंदकुमार शर्मा हे मऊचे रहिवासी आहेत. विशेष म्हणजे २००१-२०१३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी अरविंदकुमार हे मुख्यमंत्री कार्यालयात होते. दरम्यान, मोदी पंतप्रधान बनताच अरविंद गे पीएमओमध्ये संयुक्त सचिव झाले. त्यांच्या नोकरीला दोन वर्षे शिल्लक होती. मात्र, तरी देखील त्यांनी दोन दिवसांपूर्वीच अचानक व्हीआरएस घेतली.

- Advertisement -

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये विधानपरिषद सदस्य बनविल्यानंतर सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता दिसून येत आहे. एवढेच नाहीतर अरविंदकुमार यांना उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री बनविण्यात येऊ शकते, अशा चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील बड्या नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.


हेही वाचा – नोटीस पीरियड पूर्ण न करता नोकरी सोडणाऱ्यांना धक्का; भरावा लागणार एवढा दंड


- Advertisement -