घरदेश-विदेशअखेर 'त्या' जाहिरातीबद्दल बर्गर किंगनं मागितली माफी

अखेर ‘त्या’ जाहिरातीबद्दल बर्गर किंगनं मागितली माफी

Subscribe

बर्गर किंगनं केलेली जाहिरात त्यांच्याच अंगाशी आली आणि त्यामुळं त्यांना माफी मागावी लागली आहे. फिफा फिव्हरमध्ये केली चुकीची जाहिरात.

सध्या फिफा वर्ल्ड कप फिव्हर सगळीकडेच पसरला आहे. प्रत्येकजण आपल्या ब्रँडसाठी फिफा फिव्हरची मदत घेत आहे असं सध्या चित्र आहे. बर्गर किंगनंदेखील ही संधी सोडली नाही. मात्र बर्गर किंगनं केलेली जाहिरात त्यांच्याच अंगाशी आली आणि त्यामुळं त्यांना माफी मागावी लागली आहे.

काय आहे प्रकरण?

सोशल मीडियाद्नारे १९ जूनला फिफा वर्ल्ड कप रशियामध्ये आपला ब्रँड प्रमोट करण्यासाठी बर्गर किंगनं एक नामी युक्ती लढवली. फिफाच्या एका खेळाडूपासून गरोदर राहिल्यास, रशियन महिलेला आजन्म व्हूपर्स हा बर्गर मोफत मिळेल आणि त्याव्यतिरिक्त तिला युएसडी ४७ हजार जिंकण्याची संधी मिळेल अशी जाहिरात बर्गर किंगनं व्हीके या सोशल साईटवरून केली. मात्र या जाहिरातीनंतर जनतेमध्ये असंतोष पसरला आणि त्यामुळं बर्गर किंगला ही जाहिरात मागे घेत माफी मागावी लागली आहे. व्हीकेच्या साईटवरच बर्गर किंगनं आपला माफीनामा पोस्ट केला. महिलांचा अपमान करणारं हे कॅम्पेन असल्यामुळं यासंदर्भातील सर्व जाहिराती काढून टाकत माफी मागत असल्याचं त्यांनी पोस्ट केलं. बुधवारी सीएएन या वृत्तसंस्थेनं याबाबतीत बातमी दिली आहे. मात्र बर्गर किंग अथवा बर्गर रूस या दोन्ही संस्थांकडून सीएनएननं संपर्क साधला असता कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -