घरदेश-विदेशहैदराबाद बलात्कार प्रकरण: माझ्या मुलाला जाळून टाका - आरोपीची आई

हैदराबाद बलात्कार प्रकरण: माझ्या मुलाला जाळून टाका – आरोपीची आई

Subscribe

पोलिसांनी केलेल्या तपासातून या तरुणीवर सामुहिक बलात्कार करून तिला नंतर जाळून टाकल्याची घटना समोर आली.

हैदराबादच्या २६ वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या तरूणीवर निर्दयपणे बलात्कार करून तिला जाळून टाकले. दरम्यान बलात्कार करून ठार मारल्याप्रकरणी चार आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी समस्त हैदराबादच्या संतापलेल्या नागरिकांकडून होत आहे. या संतापलेल्या नागरिकांच्या भावना आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करत या चार नराधमांपैकी दोन नराधम आरोपींच्या पालकांनी त्यांची मुलं दोषी आढळल्यास त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे. गुरुवारी सकाळी २६ वर्षीय डॉक्टर तरुणीचा हैदराबादमधील शादनगर येथून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर अंडरब्रिजच्या खाली जळलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी केलेल्या तपासातून या तरुणीवर सामुहिक बलात्कार करून तिला नंतर जाळून टाकल्याची घटना समोर आली.

…तर त्यालाही जाळून टाका

सामुहिक बलात्कार प्रकरणातील चेन्नकेशवुलू नावाच्या एका आरोपीच्या आईने जय्यमाने माध्यमांना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्या मुलाने जर असा भयंकर गुन्हा केला असेल तर त्यालाही जाळून टाका. माझ्यासाठी माझा मुलगा काहीच नाही. जे चुकीचे आहे ते चुकीचे आहे. यावेळी पिडीत तरूणीच्या आईने आपली व्यथा मांडताना असे सांगितले की, नऊ महिन्यांनंतर एका मुलीला जन्म दिला. तिचा अशा प्रकारच्या गुन्ह्यात बळी जात असेल तर तिने तरी काय करायला हवे. ‘

- Advertisement -

तसेच जयम्माने सांगितले की, ‘मंगळवारी आरोपी आरिफ हा चेन्नकेशवुलूला कुठेतरी नेण्यासाठी घरी आला होता. तो लगेच दुसऱ्या दिवशी परत येणार होता मात्र तो आलाच नाही. तो गेल्या सहा महिन्यांपासून चेन्नकेशवुलू कोणतेही काम करत नव्हता. त्याला किडनीचा आजार असल्याने तो हैदराबादच्या निझामच्या वैद्यकीय विज्ञान रुग्णालयात उपचार घेत होते. ‘त्याने असा मोठा अपराध केला आहे, असा विश्वास आम्हाला नाही. मात्र त्याने खरंच असा गुन्हा केला असेल तर त्याला देखील इतर आरोपींप्रमाणे कठोर शिक्षा करावी’, अशी आरोपीच्या आईने प्रतिक्रिया दिली.

यावेळी जयम्मा म्हणाली, ‘मलाही एक मुलगी आहे. आणि पीडित तरूणीच्या आईला ज्या वेदना होत असतील त्या मी समजू शकते.’ तर आरिफ या आरोपीच्या वडीलांनी आपल्या मुलास योग्य ती कठोर शिक्षा देण्यात यावी. हे चारही नराधम आरोपी तेलंगणाच्या नारायणपेठ जिल्ह्यातील आहेत. दरम्यान शनिवारी मकथळ येथील नागरिकांनी पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी मोठा निषेध देखील दर्शवला होता. सध्या या चारही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून जाळून मारले
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -