गढवा-अंबिकापूर मार्गावर बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला, तर ३९ जणं जखमी झाले. मंगळवारी मध्यरात्री वर हा अपघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्या लोकांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. बसखाली काही प्रवाशी दबल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरु आहे. तसेच अपघातातील मृतांचा आकडा वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे
Jharkhand: 6 dead and around 39 people injured after a bus fell into a gorge in Garhwa. Rescue operations underway. More details awaited. pic.twitter.com/eWEBezfduG
— ANI (@ANI) June 25, 2019
झारखंडमधील गढवा-अंबिकापूर मर्गावर जिल्हा मुख्यालायापासून जवळपास १४ किलोमीटरच्या अंतरावर ही घटना घडली. छत्तीसगढमधील अंबिकापूरपासून गढवा येथे जाताना बस दरीत कोसळली. या अपघातात ६जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे, तर ३९ जणं जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमधून कितीजण प्रवास करत होती? अद्याप याची माहिती मिळाली नाही. मात्र, बसखाली काहीजण दबल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बसखाली दबलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य करत आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली आहे.