घरदेश-विदेशकर्नाटकमध्ये बस-ट्रकची भीषण धडक

कर्नाटकमध्ये बस-ट्रकची भीषण धडक

Subscribe

मुंबईचे ६ जण ठार

दिवाळीच्या सुट्टीत कर्नाटकमध्ये फिरायला गेलेल्या खासगी बसला हुबळी-धारवाड रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधले सहा जण ठार झाले. तर दहा जण जखमी झाले. जखमींना हुबळीतील हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. मुंबईतील हे प्रवासी दरवर्षी दिवाळी सुट्टीत मुंबईबाहेर फिरायला जातात. यंदाही ते कर्नाटकात गेले होते. त्यासाठी बस केली होती. बसमध्ये वृद्ध प्रवाशांची संख्या मोठी होती. कर्नाटकातील विविध पर्यटनस्थळांना दिवसभर भेट देऊन हे प्रवासी शनिवारीच रात्री ट्रेनने मुंबईकडे परतणार होते. सकाळच्या वेळी बस हुबळी-धारवाड रस्त्यावरून जात असताना
अंनिगेरी गावाजवळ बस आणि ट्रकची भीषण धडक झाली. यात बसमधील ६ जणांचा मृत्यू झाला. सुमेधा जामसंडेकर (५८. रा. घाटकोपर), लहू केळुस्कर (५६, भांडुप), विश्वनाथ, रमेश, दिनकर, सुचित्रा अशी मृतांची नावे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -