घरट्रेंडिंगपाहा; बाजारात आला मोदींचा 'मुखवटा'

पाहा; बाजारात आला मोदींचा ‘मुखवटा’

Subscribe

'हा मुखवटा विकत घ्या आणि तुमच्यातील मोदी चाहत्याला व्यक्त होण्याची संधी द्या', अशा अर्थाचा मजकूर एका पोस्टद्वारे शेअर करण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपला जोरदार प्रचार-प्रसार सुरु केला आहे. सर्व पक्षीय नेते विविध माध्यमांतून आपल्या मतदापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. पोस्टरबाजी, सभा, सोशल मीडियावरुन प्रचार यासोबतच भारतीय जनता पक्ष प्रचारासाठी थेट ऑनलाईन बाजारपेठेत उतरला आहे. भाजपाने आता चक्क मोदींच्या चेहऱ्याचा मुखवटा विकण्यास सुरुवात केली आहे. मोदी भक्तांना नमो अॅप्लिकेशवरुन हा मुखवटा विकत घेता येणार आहे. भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन पंतप्रधान मोदींच्या या मुखवट्याविषयीची आणि त्याच्या विक्रीसंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. ‘हा मुखवटा विकत घ्या आणि तुमच्यातील मोदी चाहत्याला व्यक्त होण्याची संधी द्या’, अशा अर्थाचा मजकूर या पोस्टद्वारे शेअर करण्यात आला आहे. सोबतच मुखवट्याच्या विक्रीची लिंकही शेअर करण्यात आली आहे. हा मुखवटा २७५ रुपयांना उपलब्ध असून तीन मुखवट्यांचा सेट ६९९ रुपयांना विकत घेता येणार आहे.


‘नमो’ चे ऑनलाईन कॅम्पेन

नमो App च्या माध्यमातून मोदींचे फोटो आणि स्लोगन असलेले मग, टीशर्ट, किचैन्स, टोप्या अशा अनेक गोष्टींची विक्री केली जाते. समोल आलेल्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान मोदींच्या नमो अॅपवरून गेल्या तीन महिन्यांमध्ये ५ कोटींच्या वस्तू विकल्या गेल्या आहेत. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नमो अगेन म्हणजेच ‘पुन्हा एकदा नमो’ या मोहिमेअंतर्गत या वस्तूंची विक्री केली जात आहे. या वस्तूंची सर्वाधिरक खरेदी  भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांमधून आणि देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. नमो अॅपशिवाय paytm तसंच Amazon सारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवरुनही मोदींच्या वस्तूंची विक्री केली जात आहे. पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या डिजीटल इंडियाचा फायदा त्यांच्याच वस्तूविक्रीला अधिक झाल्याचे रिपोर्टमधून समोर आले आहे.

- Advertisement -

उपलब्ध माहितीनुसार, १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ६८व्या वाढदिवसानिमित्त स्पेशल ऑफरअंतर्गत अशाप्रकारच्या वस्तूंची सर्वाधिक विक्री झाली होती. आठवडाभर सुरु असलेल्या त्या ऑफरमधून एकूण २ कोटी ६४ लाखांची कमाई झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -