घरदेश-विदेशपाकिस्तानी चायवाला पुन्हा चर्चेत; सोशल मीडियावर निळ्या डोळ्यांसाठी झालेला फेमस

पाकिस्तानी चायवाला पुन्हा चर्चेत; सोशल मीडियावर निळ्या डोळ्यांसाठी झालेला फेमस

Subscribe

२०१६ मध्ये निळे डोळे, गोरा वर्ण, निळा शर्ट घातलेला पाकिस्तानी चहावाला आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यावेळी त्याच्या निळ्या डोळ्यांमुळे तो सोशल मीडियावर चांगलाच फेमस झाला होता. आता पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून रातोरात स्टार झालेला अरशद खान तब्बल ४ वर्षांनंतर चर्चेत आला आहे. अरशदने इस्लामाबादमध्ये स्वतःच्या मालकीचे कॅफे सुरु केले असून इस्लामाबादच्या रस्त्यांवर चहा विकणारा सामान्य मुलगा आता एका कॅफेचा मालक झाला आहे.

कॅफे मालक अरशद म्हणतो की,

अनेक लोकांनी मला सांगितलं की कॅफेचं नाव अरशद खान असे सांगितले पण मी त्यांना स्पष्ट नकार दिला. कारण चायवाला म्हणून माझी ओळख निर्माण झाली आहे, अशी माहिती त्याने उर्दू न्यूजला दिली आहे.

- Advertisement -

पाकिस्तानमधील फोटोग्राफर जिया अली या तरुणीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चहावाल्याचा फोटो शेअर केला होता. तेव्हा निळ्या डोळ्यांच्या चायवाल्यांने लाखो तरुणींना घायाळ केले होते. त्यानंतर ‘पाकिस्तान का चायवाला’ या नावाने प्रसिद्ध तो झाला होता. अरशदने इस्लाबादमध्ये आपल्या चहा कॅफेचे उद्धाटन केले आहे. कॅफे चायवाला रूफ टॉप असे नाव त्याने त्याच्या कॅफेला दिले आहे. पाकिस्तानमधील उर्दू न्यूजने या बातमीला दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

आता पाकिस्तान बासमती तांदुळासाठी भारताशी भांडणार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -