घरदेश-विदेश२ किलो तांदूळ देतो असे सांगून दाखवला अश्लील व्हिडीओ आणि केला बलात्कार!

२ किलो तांदूळ देतो असे सांगून दाखवला अश्लील व्हिडीओ आणि केला बलात्कार!

Subscribe

या घटनेत पीडित महिलेने पोलीस प्रशासनाकडून न्यायाची मागणी केली आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने लोकांना खाण्यापिण्याची कमतरता भासू लागली आहे. अशा परिस्थितीत एका मार्बल कॉन्ट्रक्टरने त्याच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला २ किलो तांदूळाचा आमिष दाखवून घरी बोलावले आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनजेपी पोलिस ठाण्याचे पूर्व फुलवारी येथील एका महिलेच्या शेजारी राहणाऱ्या मुजबीर रहमान याने २ किलो तांदळाच्या आमीष दाखवत महिलेला घरी बोलावले. ही महिला तांदुळ घेण्यास घरात आल्यानंतर मुजबीर रहमानने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला, परंतु या महिलेने तेथून पळ काढत आपले घऱ गाठले. यानंतर तिने आपल्या पतीला संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला.


मुलाने आईविरूद्ध रचला घृणास्पद कट; आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल!

पीडित महिलेचा नवरा मुजबीर रहमानकडे मार्बल मेकॅनिक म्हणून काम करत होता. मुजबीर रहमान हा मार्बल कॉन्ट्रक्टर असून काही दिवसांपूर्वी मुजबीर रहमानने या महिलेचा आक्षेपार्ह व्हिडीओ देखील काढला होता. पीडित महिलेने सांगितले की, सोमवारी जेव्हा ती मुजबीर रहमानच्या घरी २ किलो तांदूळ घेण्यासाठी गेली होती. त्यानंतर मुजबीर रहमानने तिला तिचाच आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवला आणि तिला घरात घेऊन जबरदस्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा त्याचा हा डाव फसला तेव्हा त्याने या घटनेची कोणाकडेही चर्चा केली तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करेल अशी धमकी महिलेला दिली. यासह त्याने जीवे मारण्याची धमकी देखील तिला दिली होती.

- Advertisement -
महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केली तक्रार

पीडित महिलेने मुजबीर रहमानवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप करत सिलीगुडी महानगरातील एनजेपी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली. तक्रार दिल्यानंतर आरोपी मुजबीर रहमान परिसरातून फरार असून ते आरोपीचा शोध घेत आहेत, परंतु अद्याप पत्ता लागला नाही. या घटनेत पीडित महिलेने पोलीस प्रशासनाकडून न्यायाची मागणी केली आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -