म्हणून देवळात सॅनिटायझर वापरण्यास केली बंदी; कारण तरी ऐका

देवळात सॅनिटायझर वापरण्यास भोपाळमधील पुजाऱ्यांनी केली बंदी.

Bhopal
Can’t allow sanitisers in temples, has alcohol: Bhopal priest
म्हणून देवळात सॅनिटाटयजर वापरण्यास केली बंदी; कारण तरी ऐका

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन जाहिर करण्यात आले होते. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, उद्योग धंदे, धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. मात्र, सध्या देशात ५ वे लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे आताच्या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. सरकारने टप्प्या – टप्प्याने एक – एक गोष्टी सुरु करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये येत्या ८ जून पासून देशभरात धार्मिक स्थळे सुरु करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी देव संस्थांनांना स्वच्छता आणि गर्दी होणार नाही या गोष्टींची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, याला भोपाळमधील पुजाऱ्यांनी विरोध केला आहे.

या पुजाऱ्यांच कारण तरी ऐका

सरकारच्या नवीन नियमांप्रमाणे देवळात सॅनिटाजर मशिन लावण्याचे अनिर्वाय करण्यात आले आहे. या नियमाला भोपाळच्या पुजाऱ्यांनी विरोध केला आहे. ते म्हणतात की, ‘ज्याप्रमाणे दारु पिऊन मंदिरात प्रवेश करणे योग्य मानले जात नाही, त्याचप्रमाणे हातावर दारु घेऊन आत प्रवेश करणे योग्य ठरणार नाही. कारण सॅनिटाजरमध्ये दारुचा समावेश असतो आणि त्यामुळेच आम्ही याला विरोध केला आहे’. वैष्णवधाम नवदुर्गा मंदिराचे पुजारी चंद्रशेखर तिवारी यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली आहे. तसेच लोकांना हात धुण्यासाठी साबण ठेवण्याची तयारी असल्याचेही तिवारींनी यावेळी सांगितले आहे.

यालाही आहे बंदी

केंद्र सरकारच्या नवीन नियमांप्रमाणे स्वच्छतेसोबत मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे करण्यात आले आहे. यासोबत गाभाऱ्याती मुर्तीला स्पर्श न करणे, प्रसाद, नारळ-हार इत्यादी गोष्टी अर्पण करण्यास सध्या मनाई करण्यात आली आहे.


हेही वाचा – राज्यात चार वर्षात कोळशाच्या चौदा खाणी; ११ हजार ५०० कोटींची गुंतवणूक