हिमाचल प्रदेशमध्ये कार दरीत कोसळली; ११ जण ठार

हिमाचलप्रदेशमध्ये भीषण अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात असलेली कार दरीत कोसळली. अपघातातील सर्व मृत पांगी याठिकाणचे रहिवासी आहेत.

Himachal pradesh
himachal pradesh car accident
हिमाचलप्रदेशमध्ये कार दरीत कोसळली

हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. कार दरीमध्ये कोसळून झालेल्या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. रोहतांग दर्रेजवळ हा अपघात झाला आहे. कार चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटल्यान कार थेट दरीत कोसळली.

कारवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

भरधाव वेगात असलेल्या स्कार्पिओ गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी दरीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ३ पुरुष, ५ महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश आहे. सर्व जण स्कार्पिओ गाडीने कुल्लूवरुन पांगी येथे जात होते. सर्व जण पांगी याठिकाणचे रहिवासी असून यामध्ये दोन कुटुंब प्रवास करत होते.

अपघातात कार चालकाचाही मृत्यू

या अपघातामध्ये कार चालकाचा देखील मृत्यू झाला आहे. दरीमधून मृतदेह बाहेर काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. सर्व मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. हा अपघात ऐवढा भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूरा झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली असून तपास सुरु आहे.