करोनाचा सेक्सलाईफवरही होतोय दुष्परिणाम

mumbai

जगभरात हजारो लोकांचे जीव घेणाऱ्या करोना व्हायरसचे पुरुषांच्या सेक्सलाईफवरही दुष्परिणाम होत असल्याचे समोर आले आहे. करोना मुक्त झालेल्या पुरुषांमद्ये वीर्य निर्मितीची प्रक्रियाच बंद झाली असून त्यांचे अंडकोष खराब होत असल्याचा धक्कादायक खुलासा चीनमधील एका संशोधन संस्थेने केला आहे. या संशोधनाचा अहवाल medRxiv.org वर प्रकाशित करण्यात आला आहे.

चीनमध्ये ज्या शहरात सर्वप्रथम करोनाने कहर केला होता त्या वुहानमधील झॉन्गनान रु्ग्णालयातील संशोधकांनी नुकतेच करोनामुक्त झालेल्या ८१ पुरुषांवर संशोधन केले. यावेळी या सर्व पुरुषांच्या सेक्स क्षमतेवर परिणाम झाल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले. यात २० वर्षाच्या तरुणांपासून ५४ वर्षीय व्यक्तीचाही समावेश होता. यावेळी सर्वच पुरुषांनी त्यांची सेक्सलाईफ बिघडल्याचे सांगितले. या सर्व पुरुषांना जानेवरी महिन्यात करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना झॉन्गनान रु्ग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिन्याच्या कालावधीनंतर त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात बोलावण्यात आले. त्यावेळी अनेकांनी सेक्सलाईफ संपल्याचे डॉक्टरांना सांगितले. यामुळे संशोधकांनी क्लिनिकल रिसर्च सेंटर फॉर प्रिनेटर डायग्नोसिस अँड बर्थ हेल्थच्या शास्त्रज्ञांची मदत घेत या सर्व पुरुषांची सेक्स हार्मोन्सची चाचणी करण्यात आली .त्यात या सर्व करोनामुक्त पुरुषांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन हे हार्मेान्स असंतुलित झाल्याचे समोर आले. वैद्यकिय भाषेत ज्याला T/LH असे म्हणतात.

जर T/LH चे प्रमाण असंतुलित झाले तर अंडकोष काम करण्याचे थांबतो. परिणामी या पुरुषांमध्ये वीर्य़ तयार होत नसल्याचे संशोधनात समोर आले. यामुळे संशोधकांसह संपू्र्ण वैद्यकिय क्षेत्रापुढे नवीन आव्हान उभे राहील्याचे झॉन्गनान रुग्णालयाने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here