करोनाचे भविष्य आता भारताच्या हातात– जागतिक आरोग्य संघटना

करोनाचे भविष्य आता भारताच्या हातात आहे. या महामारीला रोखण्यासाठी भारताला अधिक आक्रमकपणे काम करावे लागणार आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. २३ मार्च रोजी जिनिव्हा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेच्या इमर्जन्सी हेल्थ प्रोग्रामचे संचालक माईक रेयन यांनी स्वित्झर्र्झलँड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आहे.

भारत हा चीनप्रमाणेच सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. करोनाचे भविष्यही अशाच देशांवर अवलंबून आहे . कारण या ठिकाणी तो किती क्षेत्रफळापर्य़ंत पसरू शकतो हे आता कळणार असल्याचे रेयान यांनी म्हटले आहे. भारताने यावर अधिक आक्रमकपणे काम करणे गरजेचे आहे. भारताचे कांजण्या आणि पोलिओला नष्ट करण्यात मोठे योगदान आहे. असेच काम भारताने करोनासाठी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था व स्थानिकांची मदत घ्यावी. कारण भारताकडे तशी क्षमताही आहे.

या महामारीवर कोणताही ठोस उपचार नाही. फक्त संयम आणि योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे ऱेयन यांनी म्हटले आहे. यामुळे भारताने यासाठी योग्य ती कारवाई करत जगाला नवी दिशा दाखवावी असे आवाहन रेयन यांनी केले आहे.