घरदेश-विदेशBREAKING: भाजप मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातून १.८० कोटींची रोकड जप्त

BREAKING: भाजप मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातून १.८० कोटींची रोकड जप्त

Subscribe

भाजपच्या अरुणाचल प्रदेशमधील मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातल्या गाडीतून १ कोटी ८० लाख रुपये सापडल्यानंतर मोठी खळबळ माजली आहे. काँग्रेसकडून या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेमा खांडू यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी जात आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या गाड्यांच्या ताफ्यातून १ कोटी ८० लाख रुपये जप्त केल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. मंगळवारी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामधल्या गाडीवर ही रेड टाकण्यात आली. यासंदर्भातले व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पासीघाटच्या उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात कारवाई सुरू आहे. विशेष म्हणजे इथेच पासीघाटमध्ये आज बुधवारी सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होती. त्यामुळे या प्रकरणावर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आली असून मुख्यमंत्री पेमा खांडूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, पंतप्रधानांना याविषयी माहिती होती का? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. हा ‘नोट फॉर वोट’चा देशाच्या इतिहासातला सगळ्यात गंभीर प्रकार असल्याची टीका देखील काँग्रेसकडून करण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी, अरुणाचल पोलीस कारवाई करत असताना दिसत आहेत. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती.

काँग्रेसने उपस्थित केलेले प्रश्न

  • हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी होते का?
  • इतके पैसे आले कुठून? हा काळा पैसा आला कुठून?
  • भाजपचे अरुणाचलचे प्रदेशाध्यक्ष तापीरगाव यांच्याकडे मणिपूर निवडणुकांदरम्यान टाकलेल्या रेडमध्येसुद्धा अशाच प्रकारे कॅश सापडली होती
  • पंतप्रधानांना या पैशासंदर्भात माहिती होतं का?
  • निवडणूक आयोग का कारवाई करत नाही?
  • गेल्या १२ तासांमध्ये या प्रकरणी अजूनपर्यंत गुन्हा दाखल का झाला नाही?

दरम्यान, या प्रकरणी काँग्रेसने जोरदार टीका करून कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बुधवारी दुपारी १२च्या सुमारास जाहीर पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली.

जर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा सिद्ध झाला तर त्यांच्याविरोधात कारवाई व्हावी. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि अरुणाचलाचे भाजप प्रदेशाध्यक्ष तापीरगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. पेमा खांडूंना त्वरीत पदावरून हटवण्यात यावं. शिवाय तापीरगाव यांची उमेदवारी देखील निवडणूत आयोगाने रद्द करावी.

रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते, काँग्रेस

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -