घरलोकसभा २०१९ग्राउंड रिपोर्टआंध्र प्रदेशात होणार अटीतटीचा सामना

आंध्र प्रदेशात होणार अटीतटीचा सामना

Subscribe

लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात काँटे की टक्कर होणार आहे. ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर मतमोजणी अर्थातच २३ मे रोजी होणार आहे. ही निवडणूक आंध्र प्रदेशातील तीन दिग्गज नेत्यांमधली मानली जात आहे. एतिहासिकदृष्ठ्या काँग्रेस आणि तेलगू देसम पक्ष (टीडीपी) या दोन पक्षांमध्ये आंध्र प्रदेशातील राजकारण विभागले आहे. मात्र यावेळी टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू, युवाजन सर्मिका रायथू काँग्रेसचे (वायएसआरसी) वायएस जगनमोहन रेड्डी आणि जन सेनेचे पवन कल्याण यांच्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान जोरदार सामना होणार होणार आहे. आंध्र प्रदेशातून तेलंगना वेगळे झाल्यानंतर आंध्र प्रदेशात लोकसभेच्या २५ जागा आणि विधान सभेच्या १७५ जागा राहिल्या आहेत. २००४ आणि २००९ साली काँग्रेस राज्यात सत्तेत होती. मात्र विभाजनानंतर आंध्र प्रदेश टीडीपीच्या ताब्यात गेले. नायडू यांनी राज्यात अनेक प्रकल्प आणून आपल्या पक्षाचा जम बसवला.

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून नायडू यांनी भाजपशी बंड केले. त्यामुळे ते एनडीएतून बाहेर पडले. मात्र जगनमोहन रेड्डी यांनी त्यांच्या पुढे मोठे आव्हान ठेवले आहे. सत्तेत आल्यास दलितांसाठी कल्याणकारी योजनेचे आश्वासन रेड्डी यांनी मतदारांना दिले आहे. तर कल्याण यांनी सत्तेत आल्यास शेतकर्‍यांना निधी देण्याचा वायदा केला आहे. तसेच कप्पू समुदायाला आरक्षण देण्याचे आश्वासनही कल्याण यांनी दिले आहे.

- Advertisement -

आंध्र प्रदेशातील एकूण मतदार
आंध्र प्रदेशातून आगामी लोकसभेसाठी एकूण ३.६९ मतदार, मतदान करणार आहेत. त्यात १,८६,०४,७४२ महिला, १,८३,२४,५८८ पुरुष आणि ३,७६१ किन्नर मतदार आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी १ लाख मतदारांची नव्याने नोंद झाली आहे. हे मतदार १८ ते १९ वर्षांचे आहेत.

निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे
१) शेतकर्‍यांना कर्जमाफी आणि निधी
२) कप्पू समुदायाला आरक्षण
३) आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा
४) राज्यासाठी कल्याणकारी योजना

- Advertisement -

आंध्र प्रदेशातील मतदार संघ
१- अराकू, २- श्रीकाकुलम्, ३- विझीयानगरम्, ४- विशाखापट्टणम्, ५- अनाकपल्ली, ६-काकीनाडा, ७-अमालपुरम्, ८-राजाहमुंड्री, ९-नरसापुरम्, १०- इलुरू, ११- मचिलीपट्टणम्, १२ – विजयवाडा, १३ – गुंटूर, १४- नारासाराओपेट, १५- बपाटला, १६- आेंगोले, १७- नंदयाल, १८- कुरनूल, १९- अनंतपूर, २०- हिंदूपूर, २१- कडपा, २२- नेल्लोर, २३ – तिरुपती, २४ – राजमपेठ, २५ -चित्तोर.

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीतील पक्षीय बलाबल
भाजप- ३, काँग्रेस -२, तेलंगणा राष्ट्रीय समिती- ११, तेलगू देसम पक्ष -१६, एआयएमआयएम-१, वायएसआर काँग्रेस -९

Santosh Malkarhttps://www.mymahanagar.com/author/msantosh/
आपलं महानगर मुंबई आवृत्ती निवासी संपादक. गेली २५ वर्षे पत्रकारितेत आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -