सुप्रीम कोर्टाचे वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोवर यांच्या घरावर सीबीआयचा छापा

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोवर यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे.

New Delhi
cbi raids on senior lawyers indira jaising and anand grovers mumbai and delhi home
सुप्रीम कोर्टाचे वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोवर यांच्या घरावर सीबीआयचा छापा

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ वकील आनंद ग्रोवर आणि इंदिरा जयसिंग यांच्या मुंबई आणि दिल्ली येथील निवासस्थानावर गुरुवारी सीबीआयने छापा टाकला आहे. सामाजिक संस्थेमार्फत विदेशातून फंडीग आणून पैशांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विधी नियमन कायद्याचे (एफसीआरए) त्यांनी उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीआय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी सीबीआयने याप्रकरणी एफआरआय दाखल केला होता. त्याच पार्श्वभूमीवर सीबीआयने ही कारवाई केली आहे. विदेशातून आलेल्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप दोघांवर आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

आनंद सिंग आणि इंदिरा जयसिंग यांनी लॉयर्स क्लेक्टिव्ह नावाची सामाजिक संस्था स्थापन केली होती. या संस्थेसाठी विदेशातून निधी गोळा केला होता. विदेशातून निधीची मदत घेतल्यामुळे त्यांनी निधी नियमन कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप सीबीआयने केला होता. त्यामुळे सीबीआयने दोघांच्या विरोधात एफआरआय दाखल केला होता. याच प्रकरणाचा छडा सीबीआय लावत आहे. दरम्या, केंद्रिय गृहमंत्रालयाने त्यांच्या संस्थेचे परवानाही रद्द केला आहे.


हेही वाचा – बंडखोर आमदारांमध्ये फूट; एस. टी. सोमशेखर बंगळुरूला परतले