घरदेश-विदेशनीरव मोदीच्या अटकेची सीबीआयकडून मागणी!

नीरव मोदीच्या अटकेची सीबीआयकडून मागणी!

Subscribe

विजय माल्या पाठोपाठ हजारो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करुन भारता बाहेर पळालेल्या नीरव मोदीला तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी सीबीआयने ब्रीटन मधील इंटरपोल संस्थेकडे संपर्क साधत केली आहे.

पीएनबी बॅंकेत हजारो कोटींचा गैरव्यवहार करुन भारताबाहेर पळालेला प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. सध्या नीरव मोदी ९ लाखांचं जॅकेट घालून ब्रीटनमध्ये फिरत असल्याचा व्हिडिओही चांगलाच व्हयरला होत आहे. दरम्यान, तो लंडनमधून पळून जाऊ नये यासाठी त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी सीबीआयने ब्रीटनमधील इंटरपोल संस्थेकडे केली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात त्याला रेड कॅार्नर नोटीस देखील बजावण्यात आली होती. पंजाब नॅशनल बँकेला १३,७०० कोटींचा चुना लावून हिरे व्यापारी नीरव मोदी परदेशात चैनीचे जीवन जगत असल्याची माहिती समोर आली आहे. टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार नीरव मोदी याला ब्रिटनने नॅशनल इंश्योंरेंस नंबर जारी केला आहे. यानुसार तो ब्रिटनमध्ये केवळ व्यवसायच नाही तर तेथील बँकांची खातीही वापरू शकतो. दरम्यान, ईडीने प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कोर्टात नीरव विरोधात अर्ज दाखल केला होता.

भारतातील संपत्तीवर कारवाई

अलीकडेच नीरव मोदींच्या रायगडमधील शासकीय जागेत असलेला अनधीकृत बंगला पाडण्यात आला आहे. मोदी परदेशात फरार झाल्यानंतर ईडीने हा बंगला ताब्यात घेऊन त्यावर कारवाई केली. ब्रीटनच्या टेलीग्राम वृत्त संस्थने मागील वर्षीच नीरव मोदी लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती दिली होती. तसेच त्याच्या २५५ कोटींच्या संपतीवरदेखील ईडीने जप्तीची कारवाई केली होती.

- Advertisement -

अटकेसाठी प्रयत्न

नीरव मोदी लंडनमध्ये नेमका कुठे वास्तव्यास आहे? ते कळू शकलेले नाही. नीरव मोदीचा भारतीय पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तो कोणत्या कागदपत्रांच्या आधारे परदेशात फिरतो याबद्दल ब्रीटन सरकारने चौकशी करणे गरजेचे असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. नीरव मोदीवर अंतरराष्ट्रीय अटकेचा वॉरंट याआधीच जारी करण्यात आला आहे. लवकरच त्याला भारतात प्रत्यार्पण केले जाणार असून, त्याला अटक करण्यासाठी ईडीची टिम लंडनमध्ये जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -