घरताज्या घडामोडीCBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वीचे वेळापत्रक लवकरच जाहीर

CBSE बोर्डाच्या १०वी आणि १२वीचे वेळापत्रक लवकरच जाहीर

Subscribe

सीबीएसई बोर्डाच्या परिक्षा ठरलेल्या नियोजनानुसार होणार आहेत.

देशात शाळा ऑनलाईन पद्धतीने चालू आहेत. दहावी बारावीच्या परिक्षांचे काय हा प्रश्न विद्यार्थी आणि शिक्षकांना पडला आहे. आता सीबीएसई बोर्डाच्या परिक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत. परिक्षांचे वेळापत्रक लकवरच जाहीर करण्यात येईल असे सेंट्रल बोर्ड ऑफ सेंकेडरी एज्युकेशनचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी सांगितले आहे. सीबीएसई बोर्डने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले नव्हते. आता लवकरच वेळापत्रक जाहिर करण्यात येईल अशी माहिती अनुराग त्रिपाठी यांनी दिली आहे.

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्रक सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवरून (cbce.nic.in) पाहता येणार आहे. त्यामुळे आता सीबीएसई बोर्डाच्या परिक्षा ठरलेल्या नियोजनानुसार होणार आहेत.परिक्षांची माहिती देण्यासाठी वेबिनार आयोजित करण्यात आले होते. यावेळी सीबीएसईचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी परिक्षासंदर्भात माहिती दिली. ‘परिक्षा निश्चितपणे होणार आहेत. परिक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल. परिक्षांचे आयोजन कशा प्रकारे करायचे याचे आयोजन आम्ही करत आहोत’, असे त्रिपाठी यांनी सांगितले.

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली काही महिने विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून शाळेत हजेरी लावत आहेत. बोर्डाच्या परिक्षांचे वेळापत्रकही बदलावे लागले आहे. विद्यार्थ्यांच्या परिक्षांचे काय? हा प्रश्न विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांना पडला आहे. सीबीएसई बोर्डाच्या परिक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करणार असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा – रेल्वेसोबत व्यवसाय सुरु करण्याची सुवर्णसंधी; मिळेल भरपूर उत्पन्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -