घरदेश-विदेशCBSE चा विद्यार्थांना दिलासा; नववी ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम केला कमी

CBSE चा विद्यार्थांना दिलासा; नववी ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम केला कमी

Subscribe

ऑनलाईन शिक्षणामुळे सिलॅबस पूर्ण करणे शक्य नसल्याने निर्णय

कोरोना संक्रमणाचा वाढता धोका पाहता देशभरात शाळा बंद आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर आता आणखी एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आलं आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे सिलॅबस पूर्ण करणं शक्य नाही आहे. यामुळे सीबीएसईने अभ्यासक्रमाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

नववी ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमातील ३० टक्के अभ्यासक्रम कमी केल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी दिली. ते म्हणाले की, काही आठवड्यांपूर्वी मी हा निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी #SyllabusForStudents2020 वर सर्व सूचना मागवल्या होत्या. मला सांगण्यात आनंद होत आहे की आम्हाला देशभरातून १.५ हजाराहून अधिक सूचना आल्या. मोठ्या प्रमाणात आलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. इयत्ता ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा भार कमी करण्यासाठी सीबीएसईमार्फत अभ्यासक्रमात सुधारणा केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -