श्रीलंकेतील ‘त्या’ आत्मघाती हल्लेखोराचा व्हिडिओ व्हायरल

ईस्टर संडेला श्रीलंकेतील कोलंबो शहरात झालेल्या आठ साखळी स्फोटांपैकी चर्चमध्ये झालेल्या हल्ल्याचा एक धक्कादायक व्हीडीओ समोर आला आहे.

Mumbai
srilanka bomb blast
श्रीलंका बॉम्बस्फोट

ईस्टर संडेला संपूर्ण श्रीलंका शहर हादरलं. श्रीलंकेतील कोलंबो शहरात आठ साखळी स्फोट झाले. या हल्ल्यात या बॉम्बस्फोटात आतापर्यंत तब्बल ३२१ जणांचा मृत्यू झाला असून ५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्लामागील एक व्हीडीओ समोर आला आहे.

ईस्टर संडेला श्रीलंकेतील कोलंबो शहरात झालेल्या आठ साखळी स्फोटांपैकी सेंट सेबॅस्टिअन चर्चमध्ये झालेल्या स्फोटातील संशयीत आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या व्हीडीओमुळे हा स्फोट आत्मघाती पथकांद्वारे घडवून आणल्याचा अंदाज तपास पथकांनी व्यक्त केला आहे.

सेंट सेबॅस्टिअन चर्चमध्ये स्फोटहोण्यापूर्वी सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये पाठीवर एक बॅग घेऊन जाणारी व्यक्ती दिसत आहे. ही बॅग घेऊन येणारी व्यक्ती चर्चच्या आतमध्ये येऊन बसते.  ईस्टर संडेनिमित्त या चर्चमध्ये मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती लोक प्रार्थनेसाठी जमले होते. त्यानंतर काही वेळातच इथे स्फोट झाला.

सीसीटीव्हीत सुस्थितीत दिसत असलेल्या चर्चच्या स्फोटानंतर अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या, संपूर्ण छत कोसळले. या स्फोटानंतर सर्व होत्याचे नव्हते झाले होते. हा आत्मघाती हल्ला असल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.

srilanka attacks : explosion in van near colombo church when officials were defusing bomb
श्रीलंकेत आणखी एक ब्लॉस्ट; ८७ डेटोनेटर्स सापडले

१३ संशयितांना अटक

श्रीलंकेत ८ ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी आतापर्यंत १३ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. श्रीलंका सरकारने सांगितले की, यामधील जास्त बॉम्बस्फोट हे आत्मघाती होता. मृतांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानींसह एकूण ३५ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या बॉम्बस्फोटात ३ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही केरळचे राहणारे आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here