घरदेश-विदेशईशा अंबानीच्या लग्नासाठी सेलिब्रिटींची हजेरी

ईशा अंबानीच्या लग्नासाठी सेलिब्रिटींची हजेरी

Subscribe

भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीचे ईशाचे लग्न अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. तिची प्री वेडिंग सेरेमनी उदयपूरमध्ये संपन्न होत असून त्यासाठी बॉलीवूड, क्रिकेट आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत.

भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीचे ईशाचे लग्न अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले आहे. सध्या राजस्थानमधील उदयपूर येथे या शाही विवाह सोहळ्याची जोरदार तयार सुरु आहे. मुकेश आणि नीता अंबानीची मुलगी ईशा हिचा विवाह अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल याच्याशी होणार आहे. त्यांची प्री वेडिंग सेरेमनी उदयपूरमध्ये संपन्न होत आहेत. त्यासाठी बॉलीवूड, क्रिकेट आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत. निर्मात सिद्धार्थ रॉय कपूर आणि पत्नि विद्या बालन, अभिनेता जॉन अब्राहम आणि प्रिया रुंचाल, जावेद जाफरी हे उदयपूरमध्ये आले आहेत.

- Advertisement -

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि अंजली तेंडूलकर, नवविवाहीत जोडपं प्रियांका चोप्रा आणि निक जोनास, महेंद्र सिंग धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी जिवा हे देखील उदयपूरमध्ये आले आहेत.

- Advertisement -

माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांची पत्नी आणि माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन हे परदशी पाहुणेदेखील प्री-वेडिंग सेरिमनीसाठी राजस्थानमध्ये दाखल झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -