घरदेश-विदेशएयर एशियाच्या सीईओंविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा

एयर एशियाच्या सीईओंविरोधात सीबीआयने दाखल केला गुन्हा

Subscribe

सीबीआयने मंगळवारी एअर एशिया ग्रुपचे सीईओ टोनी फर्नांडिस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. टोनी फर्नांडिस यांच्यावर आंतरराष्ट्रीय उड्डाण परवाना घेण्यासाठी आवश्यक नियमांचे उल्लघंन केल्याचा आरोप आहे. सीबीआयने आरोपींच्या शोधात दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु येथील ६ ठिकाणी छापे टाकले. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये जवळपास अर्धा डझनपेक्षा अधिक जणांची नावे आहेत.

टोनी फर्नांडिस यांच्या व्यतिरिक्त ट्रॅव्हल फूडचे मालक सुनील कपूर, एयर एशियाचे संचालक आर. वेंकटरमण, विमान वाहतूक सल्लागार दीपक तलवार, एका ट्रेडिंग कंपनीचे संचालक राजेंद्र दुबे आणि काही सहकारी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसंदर्भातील आवश्यक नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाच्या नियमांचे त्यांनी उल्लघंन केल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय उड्डाण लायसन्ससाठी आरोपींना काही नियमांचे उल्लघंन केले. या नियमानुसार उड्डाणासाठी कंपनीकडे कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव आणि २० एअरक्राफ्ट असण्याची आवश्यकता असते.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -