घरCORONA UPDATEआरोग्य सेतू App विकसित करणाऱ्याबाबत खुलासा; माहिती आयोगाच्या नोटीसीनंतर सरकारचे स्पष्टीकरण

आरोग्य सेतू App विकसित करणाऱ्याबाबत खुलासा; माहिती आयोगाच्या नोटीसीनंतर सरकारचे स्पष्टीकरण

Subscribe

कोरोना काळात सरकारने बनवलेल्या आरोग्य सेतू App वरून वादंग उठले आहे. हे App नेमकं बनवले कुणी याचे उत्तरच सरकारला देता येत नसल्याची माहिती अधिकारात उघड झाली आहे. यावर आता सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. आरोग्य सेतू App विक्रमी २१ दिवसांत विकसित करण्यात आले. लॉकडाऊनमधील निर्बंध आणि मेड इन इंडिया संपर्क मागोवा App विकसित करण्याच्या उद्देशाने भारतीय उद्योग, शैक्षणिक विभाग आणि सरकार यांनी २४ तास कार्यरत राहून संक्रमण परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी मजबूत, व्यापक आणि सुरक्षित App विकसित केले, असे सरकारने म्हटले आहे.

दरम्यान, आरोग्य सेतू App नेमकं बनवले कुणी याचे उत्तरच सरकारला देता येत नाही. सौरव दास या सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केलेल्या माहिती अधिकार याचिकेत हा प्रकार उघड झाला. त्यानंतर आता केंद्रीय माहिती आयोगाने यावर एनआयसी, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला याबद्दलचा जाब विचारला. याबाबत उत्तर देताना सरकाने म्हटले की, आरोग्यसेतू App आणि त्याचे कोविड-19 संक्रमण रोखण्यातील महत्त्व याविषयी कसलीही शंका नाही. २ एप्रिल २०२० रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलीजेस आणि सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केल्याप्रमाणे, भारत सरकारने कोविड-19 विरोधात लढा देण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने लोकांना एकत्र आणण्यासाठी आरोग्य सेतू App सुरू केले.

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने आरोग्य सेतू मोबाईल App च्या माध्यमातून लोकांची माहिती गोळा करायला सुरुवात केली. यातून कोरोनाग्रस्त किंवा त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची माहिती गोळा करणे आणि त्यांना यासंदर्भात माहिती द्यायला सुरुवात गेली. मात्र, वेळोवेळी विरोधी पक्षांनी आरोग्य सेतू मोबाईल App वर आक्षेप देखील घेतला होता. या App च्या माध्यमातून लोकांची माहिती गोळा करून त्याचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे ते कुणी तयार केले यासह त्याची सर्व माहिती जाहीर करावी, अशी देखील मागणी केली गेली. या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांनीच या App वर आक्षेप घेतला होता. तसेच सरकारला नोटीसही बजावली होती.

हेही वाचा –

Bigg Boss Controversy: कलर्सचा मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत तर राज ठाकरेंना मराठीत माफीनामा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -