घरदेश-विदेशपर्रिकरांच्या निधानानंतर केंद्रात १ तर राज्यात ७ दिवसांचा दुखवटा जाहीर

पर्रिकरांच्या निधानानंतर केंद्रात १ तर राज्यात ७ दिवसांचा दुखवटा जाहीर

Subscribe

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने एक दिवसाचा राष्ट्रीय दुखावटा जाहीर केला आहे. तर गोवा सरकारने सात दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले. गेल्या वर्षभरापासून ते आजारपणाशी झुंझत होते. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला होता. मनोहर पर्रिकर अत्यंत प्रामाणिक असे नेते होते. ते भारत मातेचे खरे राष्ट्रभक्त होते. परंतु, त्यांना स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान झाले. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावत गेली. थोडीफार प्रकृतीमध्ये सुधारणा झाली की, पर्रिकर लगेच कामाला लागत. देश प्रथम, नंतर बाकीच्या गोष्टी अशा धारणेचे होते. त्यांच्या जाण्याने देशाच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला. तर गोवा सरकारने सात दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.

अंत्यदर्शनासाठी पार्थिव कला अकादमीत

मनोहर पर्रिकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी ९:३० ते १०:३० यावेळेत भाजप प्रदेश कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर १०:३० वाजता त्यांचे पार्थिव पणजीच्या कला अकादमीत ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत जनतेला त्यांचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता SAG मैदान कंपाल इथपर्यंत अंत्ययात्रा येणार आहे. दुपारी ४:३० वाजता SAG मैदान इथंच अंत्यविधी केली जाणार असून संध्याकाळी पाच वाजता त्यांच्य पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

- Advertisement -

मनोहर पर्रिकरांचे साधे राहणीमान; विधान भवनात स्कूटरने जायचे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -