घरदेश-विदेशकेंद्र सरकारनं मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढली!

केंद्र सरकारनं मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढली!

Subscribe

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा व्यवस्था केंद्रीय गृहमंत्रालयाने काढली.

२३ ऑगस्ट रोजी सहाव्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेणारे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना असलेली एसपीजी अर्थात विशेष सुरक्षा दलाची सुरक्षा काढण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. माजी पंतप्रधान असल्यामुळे त्यांना एसपीजी सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, आता ती काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे मनमोहन सिंग यांना फक्त झेड प्लस सुरक्षा असेल. मात्र, हा निर्णय त्यासंदर्भातल्या धोरणानुसारच घेण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisement -

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षेचा नियमित प्रक्रियेनुसार आढावा घेतल्यानंतर त्याला तितक्या सुरक्षेची आवश्यकता नाही हे स्पष्ट होतं, तेव्हा त्या व्यक्तीची सुरक्षा कमी करण्यात येते किंवा काढून घेतली जाते. प्रसंगी ती वाढवली देखील जाते. मनमोहन सिंग यांची कमी केलेली सुरक्षा हा याच प्रक्रियेचा एक भाग असल्याचं गृहमंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -