चंबळ नदीत ५० प्रवाशांसह बोट उलटली; अनेकजण बुडाल्याची भीती

Chambal river accident A boat with 50 passengers capsized in Chambal river

राजस्थानच्या चंबळ नदीत नाव उलटल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या बोटीतून जवळपास ५० जण प्रवास करत होते. यामध्ये लहान मुलं आणि महिलांचाही समावेश होता. यामध्ये अनेकजण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. खासदार हनुमान बेनीवाल यांनी जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारकडे मागणी केली आहे की त्यांनी तात्काळ बचावकार्यात सहकार्य करावं. आतापर्यंत २० जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

गोठडा कलाजवळ कमलेश्वर धामला जात असताना ही दुर्घटना घडली. आतपर्यंत २० जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेत अनेकजण बुडल्याची भीती आहे. त्यांचा शोध सुरु आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. ही घटना बुधवारी सकाळी ९ च्या सुमारास घडली.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं तातडीनं प्रवाशांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. घटनास्थळावर एनडीआरएफची रेस्क्यू टीम उपस्थित आहे. सोबतच अॅम्ब्युलन्स देखील घटनास्थळी पोहचल्या आहेत. या घटनेवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही दु:ख व्यक्त केलं.