घरदेश-विदेशप्रदुषित वायुमुळे होऊ शकतो 'गर्भपात'

प्रदुषित वायुमुळे होऊ शकतो ‘गर्भपात’

Subscribe

संशोधनात आलेल्या माहितीनुसार गर्भवती महिला एक आठवडा जरी दूषित हवेत राहिली तर गर्भपाताची शक्यता अधिक बळावते.

दिल्ली, मुंबई यांसारख्या शहरांमध्ये वायुप्रदुषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रदुषित हवामानाचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. यावर तोडगा काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. या प्रदुषणाचा सर्वाधिक परीणाम हा गरोदर महिलेवर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कारण अशा दूषित वातावरणामुळे गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून गर्भापाताचे प्रमाण १६ टक्क्यांनी वाढले असून ही चिंताजनक बाब असल्याचे या संशोधनात म्हटले आहे.

वाचा- दिल्ली की हवा गंदी, एअर प्युरिफायर कंपन्यांची चांदी!

गरोदर महिलांनी काळजी घ्यावी

संशोधनात आलेल्या माहितीनुसार गर्भवती महिला एक आठवडा जरी दूषित हवेत राहिली तर गर्भपाताची शक्यता अधिक बळावते. दूषित वायुमुळे श्वसनाचे विकार जडतात. गर्भवती महिलांच्या श्वसनातून दूषित वायू शरीरास गेल्यास बाळावर त्याचा परीणाम होतो. शिवाय महिलेची प्रतिकारशक्ती कमी असल्यास त्याचा परिणाम मुलाच्या वाढीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे.

- Advertisement -
air-pollution-delhi_650x400_71423148405
वायूप्रदूषणामुळे दिल्लीतील हवेत धुळीची चादर (सौजन्य- एनडीटीव्ही)

आयुष्य घटले

वायू प्रदूषणाचा परिणाम मानवी शरीरावर इतका होतो आहे की, त्यामुळे आयुष्य साधारण ८ वर्षांनी कमी होऊ शकते असा अंदाज देखील एका संशोधनातून व्यक्त करण्यात आला आहे. मेट्रो सिटीजमध्ये वाढणारी लोकसंख्या, गाड्या, उद्योगधंदे याचा परिणाम हवामानावर होत असून दिल्ली प्रदूषणात अग्रेसर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -