घरदेश-विदेश'या' मंडळींनी मोदींच्या बैठकीला फिरवली पाठ!

‘या’ मंडळींनी मोदींच्या बैठकीला फिरवली पाठ!

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक देश एक निवडणूक हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलून धरला असून या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी एक पाऊल पुढे जात बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला काही मंडळींने पाट फिरवली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक देश एक निवडणूक हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलून धरला होता. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी एक पाऊल पुढे जात बैठक बोलावली आहे. देशात अनेक दिवसांपासून एक देश, एक निवडणूक या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीत राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्षाचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. मात्र, या बैठकीस तेलगु देसम पार्टी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू, द्रमुकचे प्रमुख एम के स्टॅलिन, आम आदमी पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल हजर राहणार नाहीत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, सीपीआयचे सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांनी पाठ फिरवली आहे.

- Advertisement -

देशात अनेक दिवसांपासून एक देश, एक निवडणूक या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या बैठकीचे आयोजन केले आहे. संसद भवनाच्या लायब्रेरीमध्ये दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला तृणमुल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनी देखील या बैठकीस आपण हजर राहणार नसल्याचे मंगळवारीच स्पष्ट केलेले आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील या बैठकीस हजर राहणार नाहीत. तसेच चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाच्यावतीने जयदेव गाला हे या बैठकीस उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -